इराणचा आजवरचा धाडसी हल्ला, जेरुसलेमवर Missile डागली; हे युद्ध आता थांबवलं नाही, तर युरोप-आशियाही जळेल

Last Updated:

Israel Iran Conflict: इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आठव्या दिवशी अधिक भीषण झाला आहे. जिथे इराणने तेल अवीव, हायफा आणि जेरुसलेमसारख्या शहरांवर पुन्हा क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यांमुळे दोघे जण जखमी झाले असून संपूर्ण प्रदेशात युद्धजन्य भीतीचे वातावरण पसरले आहे.

News18
News18
जेरुसलेम: इराणने शुक्रवारी इस्रायलवर पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा हा आठवा दिवस असून, या दोन पारंपरिक शत्रूंमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
इराणी वृत्तवाहिनीवरील एका अँकरने सांगितले की, ताब्यात असलेल्या प्रदेशांच्या (इस्रायल) आकाशात इराणी क्षेपणास्त्रांची दृश्ये दिसत आहेत. अशा वेळी लष्करी संगीतही प्रसारित करण्यात आले.
तेल अवीव, हायफा, जेरुसलेम आणि बेअर्शेबा येथे हल्ले
अनेक अहवालांनुसार, इराणी क्षेपणास्त्रांचा प्रभाव तेल अवीव, हायफा, जेरुसलेम आणि बेअर्शेबा या भागांत दिसून आला. याच वेळी इस्रायली लष्करानेही दुजोरा दिला की देशातील अनेक भागांमध्ये एअर रेड सायरन्स वाजवण्यात आले. मात्र लष्कराच्या निवेदनात नेमक्या ठिकाणांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. थोड्याच वेळापूर्वी, इराणकडून इस्रायलच्या दिशेने डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांची ओळख झाल्यानंतर इस्रायलमधील अनेक भागांमध्ये सायरन्स वाजवले गेले.
advertisement
इराणच्या हल्ल्यात 2 जण जखमी
या ताज्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या मगेन डेव्हिड अडॉम (MDA) या आपत्कालीन बचाव संस्थेने सांगितले की, शरपणेल लागून दोन जण जखमी झाले आहेत. एक 16 वर्षीय मुलगा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याच्या वरच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. तर 54 वर्षीय पुरुषाच्या खालच्या पायांवर मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. MDA ने जखमांचे नेमके स्थान जाहीर केलेले नाही.
advertisement
MDA चे वैद्यकीय कर्मचारी 16 वर्षीय मुलावर उपचार करत असून त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवले आहे. 54 वर्षीय पुरुषावर देखील शरपणेलमुळे मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
‘नो रिटर्न’च्या दिशेने संघर्ष – एर्दोगान
तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी इशारा दिला आहे की, इराण आणि इस्रायलमधील वाढता संघर्ष धोकादायक टप्प्याकडे झपाट्याने जात आहे.
advertisement
अमेरिकेचा हस्तक्षेप शक्य असल्याची पार्श्वभूमी असताना बोलताना एर्दोगान म्हणाले- दुर्दैवाने, गाझामधील नरसंहार आणि इराणसोबतचा संघर्ष लवकरच ‘पॉईंट ऑफ नो रिटर्न’कडे पोहोचू शकतो. हे वेड जितक्या लवकर थांबवता येईल, तितकं चांगलं. त्यांनी इशारा दिला की या संघर्षाचे परिणाम केवळ या भागापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर युरोप आणि आशियावरही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराणचा आजवरचा धाडसी हल्ला, जेरुसलेमवर Missile डागली; हे युद्ध आता थांबवलं नाही, तर युरोप-आशियाही जळेल
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement