advertisement

युद्धात सर्वात मोठा उलटफेर, इराणने F-35 पाडले, अमेरिकन पायलटला जिवंत पकडले; पेंटागनमध्ये आणीबाणी!

Last Updated:

US Iran War: इराणच्या IRGC ने अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 लढाऊ विमानाला पाडल्याचा आणि पायलटला पकडल्याचा दावा केला आहे.

News18
News18
तेहरान: इराणच्या Islamic Revolutionary Guard Corps (IRGC)ने त्यांच्या हवाई क्षेत्रात अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 Lightning II लढाऊ विमानाला पाडल्याचा दावा केला आहे. या घटनेनंतर काही तासांतच या विमानाच्या पायलटला जिवंत पकडण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. Tasnim News Agency च्या वृत्तानुसार विमानावर हल्ला झाल्यानंतर पायलटने इजेक्ट होऊन बाहेर पडताच इराणी सैन्याने त्याला ताब्यात घेतले. या दाव्यांमध्ये जर थोडीशीही सत्यता असेल तर अमेरिका आणि इस्रायलसाठी हा मोठा धक्का मानला जाऊ शकतो.
IRGC पासून बचावासाठी पायलटचा प्रयत्न?
Tasnim News Agency च्या माहितीनुसार ही घटना पश्चिम इराणमधील कोहगिलुयेह आणि बोयर-अहमद प्रांताच्या आसपास घडली. अहवालानुसार IRGC च्या प्रगत संरक्षण प्रणालीने F-35 विमानाला लक्ष्य केले. त्यानंतर पायलटने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इजेक्ट केले आणि तो इराणी भूमीवर उतरला.
ईरान ने US F-35 के पायलट को पकड़ा! कहा- अमेरिका ने चलाया रेस्क्यू ऑपरेशन, लेकिन रहे नाकाम
advertisement
यानंतर पायलटने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अमेरिकन सैन्याने आपल्या पायलटला इराणच्या सीमाबाहेर सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याआधीच इराणी सैन्याने त्याला पकडल्याचा दावा करण्यात आला आहे.
अधिकृत पुष्टी नाही
सध्या इराणी सैन्य किंवा सरकारकडून पायलट पकडल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र जर खरोखरच अमेरिकन पायलट पकडला गेला असेल तर हा अमेरिकेसाठी मोठा धक्का ठरू शकतो. अशा परिस्थितीत इराण शांतता चर्चेत (peace talks) या घटनेचा दबाव म्हणून वापर करू शकतो.
advertisement
F-35 पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा
IRGC च्या दाव्यानुसार, हे विमान ‘लेकनहीथ स्क्वाड्रन’चा भाग होते. जे अमेरिकेच्या सर्वात ताकदवान हवाई युनिट्सपैकी एक मानले जाते. F-35 हे अमेरिकेचे अत्याधुनिक आणि ‘अजेय’ मानले जाणारे लढाऊ विमान आहे. IRGC ने असा दावा केला आहे की त्यांनी पाडलेले हे दुसरे F-35 विमान आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इराणच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करणारे हे विमान पूर्णपणे नष्ट करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
युद्धात सर्वात मोठा उलटफेर, इराणने F-35 पाडले, अमेरिकन पायलटला जिवंत पकडले; पेंटागनमध्ये आणीबाणी!
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement