Iran US Conflict: इराणचं कंबरडं मोडलं! २००० पौंडच्या बंकर-बस्टरमुळे इस्फान शहरात हाहाकार, ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
US Attack Iran: अमेरिकेने इराणच्या इस्फान शहरावर भीषण हल्ला केला. 'बंकर बस्टर' बॉम्बने केलेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील शेअर केला आहे.
Iran War: अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरोधात युद्ध पुकारून आता जवळपासा महिनाभर उलटला आहे. इराणने अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले असल्याचे चित्र आहे. दिवसेंदिवस हे युद्ध आणखीच तीव्र होऊ लागले आहे. अमेरिकेकडून एका बाजूला जमिनीवरील युद्धाची तयारी सुरू असताना दुसरीकडे इराणवरील हवाई हल्ले तीव्र केले आहे. अमेरिकेने इराणच्या इस्फान शहरावर भीषण हल्ला केला. 'बंकर बस्टर' बॉम्बने केलेल्या या हल्ल्याचा व्हिडीओ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील शेअर केला आहे.
पश्चिम आशियातील युद्धाने आता रौद्र रूप धारण केले असून, अमेरिकेने इराणच्या इस्फहान शहरावर सर्वात मोठा लष्करी हल्ला केला आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने इराणच्या एका मुख्य शस्त्रागार (Ammunition Depot) नष्ट करण्यासाठी २,००० पाउंड (सुमारे ९०७ किलो) वजनाचे महाभयंकर 'बंकर बस्टर' बॉम्ब डागले आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्फहान शहर हादरून गेले असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
बंकर भेदून शस्त्रागार उद्ध्वस्त
'वॉल स्ट्रीट जर्नल' आणि 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या वृत्तानुसार, अमेरिकेने इस्फहानमधील ज्या तळाला लक्ष्य केले, ते जमिनीच्या खाली खोलवर बांधलेले एक सुरक्षित शस्त्रागार होते. हे कंक्रीटचे मजबूत तळ फोडण्यासाठी अमेरिकेने विशेष 'पेनेट्रेटर म्युनिशन्स' म्हणजेच बंकर-बस्टर बॉम्बचा वापर केला. हे बॉम्ब जमिनीखालील अत्यंत सुरक्षित ठिकाणांनाही क्षणात उद्ध्वस्त करण्याची क्षमता ठेवतात. या हल्ल्याचा मुख्य उद्देश इराणची लष्करी ताकद मुळापासून कमकुवत करणे हा होता.
advertisement
ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडिओ
ALERT: 🚨 Massive MUSHROOM LIKE EXPLOSION slams Iranian city of Isfahan.pic.twitter.com/t58TGJRHzR
— TRENDING ➞ 911 (@911NewsBreaks) March 31, 2026
हल्ल्यानंतर काही वेळातच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' या आपल्या प्लॅटफॉर्मवर या स्फोटांचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये रात्रीच्या अंधारात आकाशात झेपावणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत. या स्फोटांची तीव्रता इतकी भीषण होती की संपूर्ण परिसर आगीच्या ज्वाळांमुळे प्रकाशाने उजळून निघाला होता. मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा इस्फहानला लक्ष्य केल्याने इराणच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
advertisement
जागतिक तणावात भर:
या ताज्या हल्ल्यामुळे इराण-अमेरिका संघर्षात आता आगीत तेल ओतले गेले आहे. लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, या स्फोटांमध्ये इराणचे मोठ्या प्रमाणावरील दारूगोळा आणि क्षेपणास्त्रांचा साठा नष्ट झाल्याचा अंदाज आहे. अद्याप जीवितहानीची अधिकृत आकडेवारी समोर आली नसली, तरी ट्रम्प यांनी स्वतः हा व्हिडिओ शेअर करणे ही इराणला दिलेली मोठी चेतावणी मानली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचा धोका टोकाला पोहोचला आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 31, 2026 12:29 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: इराणचं कंबरडं मोडलं! २००० पौंडच्या बंकर-बस्टरमुळे इस्फान शहरात हाहाकार, ट्रम्प यांनी शेअर केला व्हिडीओ









