Iran Attack on Israel: इराणचा घातक पलटवार,आसरा देणाऱ्या ठिकाणावर क्रूर हल्ला; एका Missileने जग थरथर कापू लागले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Israel Iran Conflict: इराणने इस्रायलवर थरकापजनक मिसाईल हल्ला चढवत शांततेच्या आशांवरच घाला घातला. मृत्यूचा असा तांडव माजला की आकाशातून धुराचे लोळ खाली झेपावले आणि जमिनीवर आक्रोश ऐकू येऊ लागले.
तेल अवीव: इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी एकमेकांना संपवण्याची शपथ घेतली आहे. इस्रायलने इराणच्या 600 हून अधिक लोकांना ठार केलं आहे. आता इराणही पलटवार करत आहे. यावेळी इराणने त्या ठिकाणी मिसाईल हल्ला केला आहे जिथे त्याच्या नागरिकांचे प्राण वाचले असते. होय इराणने गुरुवारी इस्रायलच्या सोरोका हॉस्पिटलवर मिसाईल हल्ला केला. इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये एकच गोंधळ उडाला. हाहाकार माजला. विनाशाचं दृश्य पाहून सगळे थरथर कापू लागले. या हल्ल्यात आतापर्यंत 25 पेक्षा जास्त लोक ठार झाल्याची बातमी आहे.
खरंतर, इराणने गुरुवारी मिसाईलने ‘सोरोका मेडिकल सेंटर’ला लक्ष्य केलं. हे इस्रायलच्या दक्षिण भागातील मुख्य हॉस्पिटल आहे. म्हणजेच दक्षिण इस्रायलमधील सगळ्यात मोठं मेडिकल सेंटर. जसजसं या सोरोका हॉस्पिटलवर इराणच्या मिसाईल्स कोसळल्या, तसतसा हाहाकार वाढत गेला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या केवळ या एका हल्ल्यामुळे 10 लाख लोकांचे प्राण टांगणीला लागले. कारण या एकाच हॉस्पिटलवर 10 लाख लोकांचं आरोग्य अवलंबून आहे.
advertisement
10 लाख लोकांचा जीव टांगणीला
सोरोका हॉस्पिटलच्या वेबसाईटनुसार, या हॉस्पिटलमध्ये 1,000 हून अधिक बेड आहेत. हे हॉस्पिटल इस्रायलच्या दक्षिण भागातील जवळपास 10 लाख नागरिकांना सेवा पुरवतं. म्हणजे इस्रायलच्या 10 लाख लोकांचं उपचाराचं ठिकाण हेच एक हॉस्पिटल आहे. जर या हॉस्पिटलवर झालेला हल्ला पूर्णतः विनाशकारी ठरला असता, तर इस्रायलमधील 10 लाख नागरिकांवर मोठी आपत्ती ओढावली असती. सध्या या हल्ल्यात 25 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत.
advertisement
हॉस्पिटलचं किती नुकसान झालं?
सोरोका हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. ते पाहून हा हल्ला किती मोठा होता, हे स्पष्ट होतं. इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. मिसाईल हल्ल्यामुळे खिडक्या फुटल्या आहेत आणि परिसरातून काळ्या धुराचे लोट दिसले. इराणने तेल अवीवमधील एका उंच इमारतीवर आणि मध्य इस्रायलमधील इतर काही ठिकाणीही हल्ले केले. इस्रायलच्या ‘मगन डेविड एडम’ बचाव संस्थेनुसार, या हल्ल्यांमध्ये किमान 40 लोक जखमी झाले आहेत. सांगितलं जातं की इराणने ‘फतह-1’ ने हल्ला केला आहे.
advertisement
इराणने 14 जूनचा बदला घेतला
view commentsइराणचं म्हणणं आहे की, हा हल्ला इस्रायलने 14 जून रोजी केलेल्या हल्ल्याचा प्रतिशोध होता. त्या इस्रायली हल्ल्यात दक्षिणी तेहरानमधील एक शाळा उद्ध्वस्त झाली होती. मात्र, इस्रायलने देखील इराणच्या अराक न्यूक्लिअर साइटवर हल्ला केला आहे. इराणच्या प्रचंड अणु कार्यक्रमावर हा हल्ला संघर्षाच्या सातव्या दिवशी झाला. सात दिवसांपूर्वी इस्रायलने इराणच्या लष्करी तळांवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि अणुवैज्ञानिकांवर अचानक हल्ले करून संघर्ष सुरू केला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 19, 2025 3:51 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran Attack on Israel: इराणचा घातक पलटवार,आसरा देणाऱ्या ठिकाणावर क्रूर हल्ला; एका Missileने जग थरथर कापू लागले


