Israel Iran Conflict: काही तरी मोठं घडणार, खामेनेई बंकरमध्ये लपले; मृत्यूसाठी बॅकअप तयार, उत्तराधिकारी निश्चित

Last Updated:

Israel Iran Conflict: इस्रायलच्या जोरदार हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून इराणचे सर्वोच्च नेता खामेनेई आता बंकरमध्ये लपून युद्धाचं नेतृत्व करत आहेत. त्यांनी स्वतःच्या मृत्यूनंतर सत्तांतरासाठी तीन गुप्त उत्तराधिकारी ठरवल्याची माहिती समोर आली आहे.

News18
News18
तेहरान: सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू असून, अशातच तेहरानमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या वृत्ताने मध्यपूर्व आशियातील तणाव आणखी वाढवला आहे. इराणचे सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनेई आता एका बंकरमध्ये लपून युद्धाची रणनीती आखत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी केवळ सैन्य कमांडरांच्या संभाव्य मृत्यूसाठी बॅकअप तयार केला नाही. तर स्वतःच्या उत्तराधिकारी म्हणून तीन वरिष्ठ धर्मगुरूंची नावेही गुप्तपणे निश्चित केली आहेत.
इस्रायलकडून झालेल्या अचानक आणि तीव्र हल्ल्यांनंतर राजधानी तेहरानमध्ये परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, खामेनेई सध्या कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक संवादापासून दूर राहत आहेत. ते केवळ एक विश्वसनीय दूतामार्फत लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. जेणेकरून त्यांचे ठिकाण ट्रॅक करता येऊ नये. हे दर्शवते की इराणचे सर्वोच्च नेतृत्व स्वतःला युद्धाच्या केंद्रस्थानी मानत आहे.
advertisement
पहलीच वेळ: एवढी तयारी आणि भीती
ही पहिलीच वेळ आहे की खामेनेईंनी आपली उत्तराधिकार योजना जाहीरपणे (गुप्त स्वरूपात) तयार केली आहे. ही केवळ एक रणनीती नाही, तर 1980 च्या दशकातील इराक युद्धादरम्यानही न जाणवलेली भीतीही यातून दिसते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या पावलाचा अर्थ असा आहे की खामेनेई यांना आता वाटू लागले आहे की या युद्धात त्यांचा मृत्यूही शक्य आहे.
advertisement
इस्रायलचे हल्ले अत्यंत घातक
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी इस्रायलने सुरू केलेले हल्ले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि विनाशकारी हल्ले ठरत आहेत. हे हल्ले इराण-इराक युद्धाच्या तुलनेत अधिक विध्वंसक आहेत. केवळ काही दिवसांत तेहरानमध्ये इतका मोठा हानी झाला आहे. जितका इराक आणि सद्दाम हुसेन आठ वर्षांतही करू शकले नव्हते.
इराणकडून पलटवार सुरू
इराणने या धक्क्यातून सावरत लगेचच दररोज प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, इराण क्षेपणास्त्रांनी इस्रायलमधील रुग्णालये, तेल शुद्धीकरण केंद्रे, धार्मिक स्थळे आणि निवासी परिसरांना लक्ष्य केले आहे. हा संघर्ष आता थेट सामान्य नागरिकांच्या जीवावर येऊन पोहोचला आहे, ज्यामुळे संपूर्ण भागात मानवी संकट अधिकच गंभीर होत आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran Conflict: काही तरी मोठं घडणार, खामेनेई बंकरमध्ये लपले; मृत्यूसाठी बॅकअप तयार, उत्तराधिकारी निश्चित
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement