इराणच्या महत्त्वाच्या बंदरात 'विनाशकारी' स्फोट: 561 जखमी, मृतांचीही भीती; घातपाताचा संशय? Video

Last Updated:

Iran News: इराणच्या दक्षिणेकडील अब्बास येथील शाहिद रजाई बंदरात शनिवारी एक 'महास्फोट' झाला. ज्यामुळे 561 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बंदरात मोठ्या संख्येने कर्मचारी असल्याने मृतांचा आकडा प्रचंड असण्याची भीती असून अणु चर्चेच्या पार्श्वभूमीवर यामागे घातपाताचा संशय व्यक्त होत आहे.

News18
News18
अब्बास (इराण): इराणच्या दक्षिणेकडील प्रमुख बंदर शहर बंदर अब्बास येथील शाहिद रजाई बंदरात शनिवारी (आज) एक मोठा स्फोट झाला. या भीषण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात किमान 561 लोक जखमी झाले आहेत.
स्फोटाच्या वेळी बंदराच्या परिसरात मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर उपस्थित होते. त्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची तसेच अनेकांचा मृत्यू झाला असण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. जखमींना तात्काळ होर्मोझगान प्रांतातील (येथे शाहिद रजाई बंदर आहे) जवळच्या वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्फोटाचे नेमके कारण सुरुवातीला अस्पष्ट होते. मात्र एका स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन अधिकाऱ्याने इराणच्या सरकारी वृत्तसंस्थांना सांगितले की- बंदराच्या धक्क्याच्या (wharf) परिसरात साठवलेल्या अनेक कंटेनरमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवण्यावर सध्या प्रशासनाचा भर आहे.
advertisement
हा स्फोट इतका तीव्र होता की बंदरापासून अनेक किलोमीटरच्या परिसरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर आकाशात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट आणि काही व्हिडिओमध्ये मशरूम क्लाउडसारखे दृश्य दिसले. या स्फोटाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. डॅश कॅममधून चित्रित केलेला एक व्हिडिओ स्फोटाच्या क्षणाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र न्यूज18 मराठीने या व्हिडिओंची सत्यता तपासलेली नाही.
advertisement
निम लष्करी तसनीम वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी बंदरातील सर्व कामकाज थांबवण्यात आले आहे. बंदरात मोठ्या संख्येने कामगार असल्याने या घटनेत 'अनेक लोक जखमी झाले असावेत किंवा त्यांचा मृत्यू झाला असावा' अशी शक्यता वृत्तसंस्थेने व्यक्त केली आहे.
advertisement
महत्त्वाची बाब म्हणजे रॉयटर्सने दिलेल्या एका स्वतंत्र अहवालानुसार, ओमानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील अणु चर्चांची तिसरी फेरी सुरू असतानाच हा स्फोट झाला आहे.
यापूर्वी 2020 मध्ये याच शाहिद रजाई बंदराच्या संगणक प्रणालीवर मोठा सायबर हल्ला झाला होता. त्यामुळे बंदराकडे येणारे जलमार्ग आणि रस्ते मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते. त्यावेळी वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार इराणचा कट्टर शत्रू असलेल्या इस्त्रायलने इराणने केलेल्या पूर्वीच्या सायबर हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केली होती.
advertisement
सध्या स्फोटाच्या कारणांचा अधिक तपास सुरू असून घटनेच्या तीव्रतेमुळे आणि मृतांच्या शक्यतेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
इराणच्या महत्त्वाच्या बंदरात 'विनाशकारी' स्फोट: 561 जखमी, मृतांचीही भीती; घातपाताचा संशय? Video
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement