चांदीचा डोंगर अन् सोन्याची खाण सापडली; 'सिल्व्हर माउंटन'ने खळबळ माजवली, उडवली वैज्ञानिकांची झोप

Last Updated:

NASA Rover News: एका दूरच्या ग्रहावर वैज्ञानिकांच्या हाती एक मोठा खजिना लागला आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी दडलेले रहस्य उलगडताना, या शोधाने वैज्ञानिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

News18
News18
वॉशिंग्टन: नासाचा पर्सीवरेंस रोव्हर (Perseverance rover) मंगळ ग्रहावर नवनवीन रहस्ये शोधण्यात व्यस्त आहे. जेजेरो क्रेटरच्या (Jezero Crater) पश्चिम कडेला पोहोचून हा रोव्हर अशा काही खास प्रकारच्या खडकांचा शोध घेत आहे. जे मंगळाच्या 3.9 अब्ज वर्षांपूर्वीच्या रहस्यांवर प्रकाश टाकू शकतात. आता या रोव्हरच्या एका महत्त्वपूर्ण शोधाने वैज्ञानिकांची झोप उडवली आहे. रोव्हरने मागील काही महिन्यांत पाच अनोख्या खडकांचे नमुने (samples) जमा केले आहेत. सात खडकांचे सखोल विश्लेषण केले आहे आणि 83 खडकांवर लेझरने तपासणी केली आहे.
गेल्या चार वर्षांपासून हा रोव्हर मंगळावर कार्यरत आहे आणि सध्याचा काळ हा त्याच्या सर्वात वेगवान वैज्ञानिक शोधांचा काळ आहे. महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, या खडकांमध्ये मंगळावर जीवनाचे रहस्य दडलेले असू शकते का? वैज्ञानिक ज्या भागात हे खडक सापडले आहेत. त्या भागाला 'सोन्याची खाण' मानत आहेत.
पर्सीवरेंस रोव्हर जेजेरो क्रेटरच्या डोंगररांगा, मोठे दगड आणि खडकाळ उतारांची कसून तपासणी करत आहे. हे क्रेटर मंगळाच्या उत्तर भागात आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी येथे एक मोठे सरोवर होते. मागील वर्षी डिसेंबरपासून रोव्हर क्रेटरच्या पश्चिम कडेला आहे.जो विच हेझेल हिल नावाच्या उंच उतारावर लक्ष केंद्रित करतो. या उतारावरील थर असलेले खडक त्या काळाची कहाणी सांगतात जेव्हा मंगळाचे हवामान आजच्यापेक्षा पूर्णपणे वेगळे होते.
advertisement
रोव्हरला सापडला प्राचीन खजिना
रोव्हरचा सर्वात मोठा शोध म्हणजे 'सिल्व्हर माउंटेन' (Silver Mountain) नावाचा चांदीसारखा दिसणारा खडक. जो 3.9 अब्ज वर्षांपूर्वीचा आहे. वैज्ञानिकांना या खडकात सर्वाधिक रस आहे. हा खडक एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही. हा खडक नोआशियन युगातील (Noachian epoch) आहे. त्या काळात मंगळावर उल्कापातांचा (meteor showers) वर्षाव होत होता आणि त्याची पृष्ठभाग खड्ड्यांनी भरलेली होती.
advertisement
नासाच्या माहितीनुसार हा खडक 'अनोखा' आहे आणि त्याची रचना यापूर्वी कधीही पाहिली गेली नाही. रोव्हरने आपल्या एक्स (X) अकाउंटवर लिहिले आहे, माझा 26 वा नमुना 'सिल्व्हर माउंटेन' काहीतरी वेगळे आहे. जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नाही. '
पाणी आणि जीवनाचे कनेक्शन?
रोव्हरला एक असा खडक देखील सापडला आहे. ज्यामध्ये सर्पेंटाइन खनिजे (serpentine minerals) भरलेली आहेत. ही खनिजे तेव्हा तयार होतात. जेव्हा पाणी ज्वालामुखीच्या खडकांसोबत रासायनिक प्रक्रिया करते. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, या प्रक्रियेतून हायड्रोजन (hydrogen) तयार होऊ शकतो. जो पृथ्वीवरील जीवनासाठी ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे. या शोधामुळे असा प्रश्न उभा राहतो की, काय मंगळावरही कधी अशा प्रकारचे जीवन अस्तित्वात होते?
advertisement
मंगळावर सोन्याची खाण!
जेजेरो क्रेटरचा पश्चिम भाग वैज्ञानिकांसाठी सोन्याची खाण ठरत आहे. कारण येथे सापडलेले खडक खजिन्यासारखे आहेत. येथे तुटलेले-फुटलेले खडक आहेत. जे अब्जावधी वर्षांपूर्वी उल्कापातामुळे मंगळाच्या पृष्ठभागाखालून उसळून बाहेर आले होते. यापैकी काही खडक कदाचित त्याच उल्कापाताचे आहेत. ज्याने जेजेरो क्रेटर तयार केले. केटी मॉर्गन यांनी सांगितले, गेले चार महिने वैज्ञानिकांसाठी वादळासारखे होते. विच हेजल हिलजवळ अजूनही अनेक रहस्ये दडलेली आहेत.
advertisement
नमुने परत आणण्याची शर्यत
वैज्ञानिक या नमुन्यांना पृथ्वीवर आणून हे शोधू इच्छितात की, मंगळावर कधी जीवन होते का. परंतु नासाच्या मार्स सॅम्पल रिटर्न मिशनचे (Mars Sample Return Mission) भविष्य अडचणीत आहे. कारण हे मिशन अत्यंत आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे आहे. या मिशनसाठी 11 अब्ज डॉलर्सचा खर्च येऊ शकतो. ज्यामुळे मिशनला विलंब होत आहे. आता नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेतला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
चांदीचा डोंगर अन् सोन्याची खाण सापडली; 'सिल्व्हर माउंटन'ने खळबळ माजवली, उडवली वैज्ञानिकांची झोप
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement