China & Russia War News: रशिया नाटो देशावर हल्ला करणार अन् त्याच वेळी चीन डाव साधणार, संपूर्ण जग पेटवणार; थरकाप उडवणारे भाकितं

Last Updated:

China & Russia War: नाटो महासचिव मार्क रुटे यांनी दिलेला इशारा थरकाप उडवणारा आहे. त्यांच्या मते, जर चीन तैवानवर हल्ला करत असेल, तर त्याआधी पुतिन युरोपात नाटोला गुंतवेल – म्हणजेच जग एकाच वेळी दोन युद्धाच्या खाईत अडकू शकते.

News18
News18
न्यूयॉर्क : एकाच वेळी दोन युद्ध सुरू होतील अशा दिशेने जगाची वाटचाल सुरू आहे की काय? असा भीतीदायक इशारा नाटोचे महासचिव मार्क रुटे यांनी दिला आहे. रुटे यांच्या ताज्या इशाऱ्यामुळे जगभरात एकच मोठी खळबळ उडाली आहे.
महासचिव मार्क रुटे यांचा दावा केला आहे की, जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर त्याआधी पुतिन कोणत्यातरी नाटो देशावर हल्ला करून युरोपला अडकवतील, जेणेकरून चीनची वाट मोकळी होईल.
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत रुटे म्हणाले, जर शी जिनपिंग तैवानवर हल्ला करणार असेल, तर तो आधी आपला भागीदार व्लादिमीर पुतिनला कॉल करून सांगेल – मी हे करणार आहे, तू युरोपमध्ये नाटोला अडकव.’” हा इशारा ब्रुसेल्समधील नाटो समिटदरम्यान दिला गेला आणि यामागची रणनीती धक्कादायक आहे.
advertisement
चीन आधीपासूनच तैवानला आपलाच भाग मानत आला आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग हे उघडपणे सांगत आहेत की, गरज भासल्यास लष्करी बळावर एकत्र आणलं जाईल. पण तैवानची जनता आजचा स्वतंत्र दर्जा योग्य मानते. आता जर चीनने हल्ला केला आणि त्याच वेळी रशिया युरोपमध्ये कुठे तरी हल्ला करेल. अशा परिस्थितीत अमेरिका आणि नाटो हे दोन्ही आघाड्यांवर विभागले जातील.
advertisement
चीन-रशियाच्या या प्लानला NATO कसं सामोरं जाणार?
रुटे यांच्या मते, हाच सर्वात मोठा धोका आहे आणि हे रोखण्यासाठी नाटोने आपली ताकद दाखवणं आवश्यक आहे. ते म्हणाले, आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. एक – नाटोला इतकं बळकट करावं की रशियाने हल्ला करण्याचा विचारही करू नये. आणि दुसरे – इंडो-पॅसिफिकसोबत भागीदारी मजबूत करावी. जे ट्रम्प आधीच करत आहेत.
advertisement
रुटे यांनी हेही स्पष्ट केलं की ट्रम्प यांची ‘अमेरिका फर्स्ट’ नीती असूनही, ते इंडो-पॅसिफिकमधील भागीदारीला प्राधान्य देत आहेत. त्यांनी ट्रम्पच्या डिफेन्स टीमचं कौतुक करताना मार्को रुबिओ आणि पीट हेगसेथ यांसारख्या नेत्यांना ‘उत्कृष्ट परराष्ट्र धोरण टीम’ असं म्हटलं.
‘डॅडी’ ट्रम्प वाचवायला येतील का?
स्वतः रुटे यांना यापूर्वी एका वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जावं लागलं होतं, ज्यात त्यांनी ट्रम्प यांना ‘डॅडी’ असं संबोधलं होतं, तेव्हा ट्रम्प यांनी इस्रायल-इराण संघर्ष थांबवण्यासाठी पुढाकार घेतला होता. पण मोठा प्रश्न हाच आहे की, जर चीन-रशिया यांनी असा दुहेरी डाव प्रत्यक्षात आणला, तर अमेरिका आणि नाटो हे थोपवू शकतील का?
मराठी बातम्या/विदेश/
China & Russia War News: रशिया नाटो देशावर हल्ला करणार अन् त्याच वेळी चीन डाव साधणार, संपूर्ण जग पेटवणार; थरकाप उडवणारे भाकितं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement