भारत-अफगाणिस्तान जवळीक,पाकिस्तान अस्वस्थ; काबूलवर हवाई हल्ला
- Published by:Prachi Amale
Last Updated:
अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे काबूल स्फोटांन हादरलं.
काबुल / इस्लामाबाद : अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर पाकिस्ताकडून हवाई हल्ला करण्यात आलायं. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानने हा हल्ला केल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ माजलीये.
अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर शुक्रवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे काबूल स्फोटांन हादरलं. विशेष म्हणजे तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी हे आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असताना हा हल्ला झाला आहे. त्यामुळे या हल्ल्याकडं भारत-अफगाणिस्तान संबंधांच्या दृष्टीनंही पाहिलं जातंय.
संघटनेचा म्होरक्या नूर वली मेहसूद पाकिस्तानच्या आश्रयाला
काबुलमधल्या या हल्ल्याची जबाबदारी तहरीक -ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेनं स्वीकारली असून या संघटनेचा म्होरक्या नूर वली मेहसूद हा पाकिस्तानच्या आश्रयाला आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यावर अफगाणी घुसखोर,सीमवाद आणि दहशतवादी कारवाया यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधले संबंध ताणले गेले होते. यावरून पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा हासिफ यांनी अफगाणिस्तान दहशतवादाला आश्रय देतय हा आरोप केल्यानंतर 48 तासांतच हा हल्ला झाल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरही खळबळ उडालीये.
advertisement
या वाढत्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्लाह अखुंदजादा. त्याचे निर्णय आता केवळ अफगाणिस्तानच नव्हे तर संपूर्ण दक्षिण आशियाचे राजकारण ठरवू शकतात, असे मानले जात आहे
कोण आहे हिबतुल्लाह अखुंदजादा?
हिबतुल्लाह अखुंदजादा हा तालिबानचा सर्वोच्च धार्मिक नेता असून त्याला ‘अमीर अल-मोमिनीन’ म्हणजेच विश्वासूंचा प्रमुख म्हणतात. 1960 च्या दशकात जन्मलेला अखुंदजादा नूरजई जमातीचा आहे आणि दीर्घकाळ शरिया न्यायालयांचा प्रमुख राहिला आहे. लष्करी अनुभव नसतानाही तो तालिबानचा सर्वात प्रभावशाली आणि अंतिम निर्णय घेणारा नेता मानला जातो.
advertisement
आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा
सध्या भारत पाकिस्तान संबंधात तणाव आहे. अशातचं अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर आल्याने पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झालाय.एकीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असतानाच. दुसरीकडे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये मैत्रीपू्र्ण संबंध सुधारत आहेत आणि त्यामुळे अफगाणिस्तानवर झालेल्या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरु झालीये.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 12, 2025 9:57 PM IST