दहशतवाद्यांनी गाड्या अडवल्या, प्रवाशांना उतरवलं, ओळखपत्रं पाहून केला गोळीबार; पाकिस्तान हादरलं
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या दहशतवाद्यांना १० वाहनांना आगही लावली. मूसाखेल हल्ला पंजाबच्या लोकांना टार्गेट करत केला गेला.
मूसाखेल : पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला झाला आहे. बलुचिस्तानच्या मूसाखेल जिल्ह्यातल्या पंजाब प्रांतात झालेल्या हल्ल्यात किमान २३ जणांचा मृत्यू झालाय. शस्त्रास्त्रे घेऊन आलेल्या दहशतवाद्यांनी बस आणि ट्रकमधून प्रवाशांना उतरवलं आणि त्यांची चौकशी केल्यानंतर गोळीबार केला. मूसाखेलच्या राराशाम जिल्ह्यात त्यांना लोकांचा रस्ता अडवला आणि प्रवाशांना बसमधून उतरवलं.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सर्वाधिक पंजाबचे रहिवासी आहेत. शस्त्रास्त्र घेऊन आलेल्या दहशतवाद्यांना १० वाहनांना आगही लावली. मूसाखेल हल्ला पंजाबच्या लोकांना टार्गेट करत केला गेला. अशा प्रकराची घटना चार महिन्यांनी पुन्हा घडलीय. एप्रिल महिन्यात बंदुकधाऱ्यांनी नोशकीजवळ एका बसमधील ९ प्रवाशांना उतरवलं होतं आणि त्यांची ओळखपत्र पाहिल्यानंतर गोळीबार केला होता.
advertisement
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अज्ञात बंदुकधाऱ्यांनी बलुचिस्तानच्या केच जिल्ह्यातील तुर्बतमध्ये गोळीबार केला होता. पंजाबमधील सहा मजुरांची गोळी झाडून हत्या केली होती. पोलिसांनी सांगितलं की या हत्या टार्गेटेड होत्या. कारण सर्व पीडित दक्षिण पंजाबच्या वेगवेगळ्या भागातील होते. जात धर्माच्या आधारे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
याआधीही असा टार्गेटेड हल्ला करण्यात आला होता. २०१५ मध्येही अशी एक घटना घडली होती. बंदुकधाऱ्यांनी सकाळी सकाळी तुर्बतजवळ असलेल्या मजुरांच्या शिबिरात हल्ला केला होता. यात २० मजुरांचा मृत्यू झाला होता. तर तिघे गंभीर जखमी झाले होते. सर्वजण सिंध आणि पंजाबमधील होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2024 12:20 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
दहशतवाद्यांनी गाड्या अडवल्या, प्रवाशांना उतरवलं, ओळखपत्रं पाहून केला गोळीबार; पाकिस्तान हादरलं