Exclusive: 'मॅडम N'चा भयानक प्लॅन उघड, फुकट टूरमागे मोठा कट; भारताविरोधातील डार्क प्लॅन
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Who is ISI Madam N: पाकिस्ताननं भारतातील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि यूट्यूबर्सना टार्गेट करून त्यांच्याकडून हेरगिरी करवण्याचा मोठा कट रचल्याचा खळबळजनक उघड झाला आहे. या कटामागे लाहोरमधील ट्रॅव्हल एजन्सी चालवणारी 'मॅडम N' अर्थात नौशाबा शहजाद असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
लाहोर/नवी दिल्ली: भारतात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि यूट्यूबर्सच्या माध्यमातून गुप्तहेरगिरी करून स्लीपर सेल उभे करण्याचा पाकिस्तानचा धक्कादायक कट उघडकीस आला आहे. या कारस्थानामागे आहे लाहोरमधील एक महिला नौशाबा शहजाद मसूद असल्याचे समोर आहे असून तिला भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘मॅडम N’ म्हणून ओळखतात.
नौशाबा पाकिस्तानात ‘जैयाना ट्रॅव्हल्स अॅण्ड टूरिझम’ ही ट्रॅव्हल कंपनी चालवत असून तिचा पती पाकिस्तानी सिव्हिल सर्व्हिसमधून निवृत्त अधिकारी आहे. तपासात उघड झाले आहे की, नौशाबा ही ISI आणि पाकिस्तानी लष्कराच्या इशाऱ्यावर भारतात 500 गुप्तहेरांचे नेटवर्क उभं करण्याचा डाव आखत होती.
advertisement
फॉर्म्युला
नौशाबा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि यूट्यूबर्सना पाकिस्तानमध्ये फिरायला बोलवायची. तिथे त्यांची भेट ISI आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांशी घडवून दिली जायची. विशेषतः हिंदू आणि शीख समाजाच्या तरुणांना ती लक्ष्य करत होती. गेल्या सहा महिन्यांत तिने तब्बल 3,000 भारतीय नागरिक आणि 1,500 परदेशात राहणाऱ्या भारतीयांना पाकिस्तानात पाठवलं, असा खळबळजनक दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
advertisement
पाक दूतावासाशी थेट संबंध
ती दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील व्हीसा अधिकाऱ्यांशी थेट संपर्कात होती. तिच्या फोनवरून वीजा मंजूर करून घेणं सहज शक्य होतं. ती वीजा फर्स्ट सेक्रेटरी सुहैल कमर, ट्रेड काउन्सलर उमर शेरयार आणि ISI एजंट दानिश यांच्याशी नियमित संपर्कात होती.
advertisement
तीर्थयात्रेच्या नावाखाली फसवणूक
सिख आणि हिंदू तीर्थयात्रांच्या पाकिस्तान दौर्याचं आयोजनही नौशाबाच करत होती. ETPB (Evacuee Trust Property Board) या संस्थेच्या मदतीने ती यात्रा आयोजित करत होती आणि अधिक पैसे वसूल करून त्याचा वापर पाकिस्तानच्या प्रोपगंडा आणि ISI च्या कारवायांमध्ये करत होती.
पैशाचा मागोवा आणि भारतातील एजंट्स
तपासात दोन पाकिस्तानी बँक खाती आणि एक फोन नंबर (+92 321 044####) सापडले असून यांच्यामार्फत भारतातून आर्थिक व्यवहार केल्याचं उघड झालं आहे. नौशाबाने दिल्लीसह भारतातील अनेक शहरांमध्ये आपले एजंट्स तैनात केले होते. हे एजंट सोशल मीडियावर ट्रॅव्हल टूरच्या नावाने प्रचार करत होते आणि लोकांना जाळ्यात ओढत होते.
advertisement
गंभीर इशारा
view commentsहा प्रकार केवळ पर्यटनाच्या नावावर सुरू झालेला गुप्त कारवायांचा भाग असून भारताच्या सुरक्षेसाठी एक मोठा इशारा मानला जात आहे. गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून देशांतर्गत एजंट्स आणि आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 05, 2025 6:12 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Exclusive: 'मॅडम N'चा भयानक प्लॅन उघड, फुकट टूरमागे मोठा कट; भारताविरोधातील डार्क प्लॅन


