डिनर की डेथ ट्रॅप, प्रसिद्ध उद्योजकाचा संशयास्पद मृत्यू, हादरवणाऱ्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Sukhi Chahal Death in US: खालिस्तानी विचारसरणीविरोधात निडरपणे लढणारे भारतीय वंशाचे उद्योजक सुखी चहल यांचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यू झाला आहे. डिनरनंतर अचानक प्रकृती बिघडून त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मृत्यूमागे कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नवी दिल्ली: भारतीय वंशाचे प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते सुखी चहल यांच्या अमेरिकेत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 31 जुलै 2025 रोजी कॅलिफोर्नियामधील एका ओळखीच्या घरी डिनरसाठी गेलेल्या सुखी चहल यांची प्रकृती अचानक बिघडली आणि जेवण झाल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जवळच्या मित्र जसपाल सिंग यांनी सांगितले की- सुखी चहल पूर्णतः निरोगी होते. त्यामुळे त्यांच्या या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
विशेष बाब म्हणजे सुखी चहल हे खलिस्तानी तत्वांचे विरोधक होते आणि अमेरिकेत भारतीय एकतेसाठी सातत्याने कार्य करत होते.
खलिस्तानी जनमत संग्रहाचा विरोध
ही घटना अशा वेळी घडली जेव्हा सुखी चहल 17 ऑगस्ट रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे होणाऱ्या खलिस्तान जनमत संग्रहाचा तीव्र विरोध करण्याच्या तयारीत होते. त्यामुळेच त्यांना अनेक दिवसांपासून धमक्या दिल्या जात होत्या. सुखी चहल ‘द खालसा टुडे’ या संस्थेचे संस्थापक आणि सीईओ होते आणि त्यांच्या खलिस्तानविरोधी विचारसरणीमुळे ते ओळखले जात होते. त्यांनी भारतीय प्रवाशांना अमेरिकेच्या कायद्यांचे पालन करण्याचा आणि गुन्हेगारीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या निडर आणि परखड मतांमुळे ते प्रो-इंडिया समुदायाचे प्रमुख चेहरा बनले होते.
advertisement
हत्या की कट?
चहल यांच्या मृत्यूने संपूर्ण समुदायात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मित्रांचे म्हणणे आहे की ही हत्या असू शकते. विशेषतः कारण की ते एका संवेदनशील विरोध मोहिमेचा भाग होते. टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, सुखी चहल यांना अलीकडच्या महिन्यांमध्ये खलिस्तानी समर्थकांकडून अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. जसपाल सिंग यांनी सांगितले की, डिनरनंतर अचानक तब्येत बिघडणे हे संशयास्पद आहे.
advertisement
पोस्टमार्टमची प्रतीक्षा
view commentsपोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा सुरू असून, त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे खरे कारण समजेल. सुखी चहल मृत्यूपूर्वी खलिस्तानी हालचालींविरोधात जागरूकता निर्माण करण्याचे काम करत होते. जे त्यांच्या मृत्यूमागे कट असण्याच्या शक्यतेला बळकटी देते. ही घटना भारतीय प्रवासी समुदायासाठी विशेषतः चिंतेची बाब आहे. कारण खलिस्तानी गट परदेशातही सक्रीय आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 03, 2025 8:56 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
डिनर की डेथ ट्रॅप, प्रसिद्ध उद्योजकाचा संशयास्पद मृत्यू, हादरवणाऱ्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली


