Trump vs Musk: 'तुझी दुकानं बंद कर अन् आफ्रिकेला परत जा'; ट्रम्प यांची जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला धमकी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Trump vs Musk: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्यातील तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना दक्षिण आफ्रिकेत निर्वासित करण्याचा विचार फेटाळला नाही.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना त्यांच्या जन्मभूमी दक्षिण आफ्रिकेत निर्वासित करण्याचा विचार फेटाळून लावलेला नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मला माहीत नाही, पण यावर विचार करावा लागेल,असे ट्रम्प यांनी म्हटले.
एलन मस्क हे अमेरिकेचे नागरीक असले, तरी त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आहे. मस्क यांनी ट्रम्प यांच्या विधेयकावर जोरदार टीका केली होती. त्यांनी या विधेयकाला "पूर्णपणे वेडसर" आणि "राजकीय आत्महत्या" असे संबोधले होते. यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी मस्क यांच्या दक्षिण आफ्रिकन मूळाचा उल्लेख करत टोला लगावला. एलनला कदाचित आपली दुकानं बंद करावी लागतील आणि दक्षिण आफ्रिकेत परत जावं लागेल, असे ते म्हणाले.
advertisement
ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिलं, मस्क यांना माझ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पाठिंब्यापूर्वीच माहिती होती की, मी केवळ इलेक्ट्रिक कार (EVs) लादण्याच्या पूर्ण विरोधात आहे. हे हास्यास्पद आहे आणि नेहमीच माझ्या प्रचाराचं एक प्रमुख धोरण राहिलं आहे. इलेक्ट्रिक कार ठीक आहेत, पण प्रत्येकाला ती जबरदस्तीने खरेदी करायला लावणं चुकीचं आहे.
advertisement
ट्रम्प पुढे म्हणाले, एलन मस्कला इतिहासात कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त सरकारी सबसिडी मिळाली असेल. आणि जर ही सबसिडी नसेल, तर त्याला कदाचित आपलं सगळं बंद करावं लागेल – रॉकेट लाँच, सॅटेलाईट्स, इलेक्ट्रिक कार उत्पादन – काहीच होणार नाही. आणि आपला देश खूप पैसा वाचवेल. कदाचित DOGE विभागाने याकडे लक्ष द्यावं लागेल.
advertisement
"DOGE म्हणजे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी" – ज्या विभागाची स्थापना मस्क यांनीच केली होती आणि मागील काही महिन्यांपासून त्याचं नेतृत्व करत होते. ट्रम्प यांनी सूचकपणे म्हटले, “DOGE हा एक राक्षस आहे आणि तोच कदाचित एलन मस्कला गिळंकृत करेल.
मंगळवारी ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद अशा टप्प्यावर गेला की तिथून परतफेडीचा मार्गच उरलेला नाही, अशी चर्चा वॉशिंग्टनच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 01, 2025 10:36 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Trump vs Musk: 'तुझी दुकानं बंद कर अन् आफ्रिकेला परत जा'; ट्रम्प यांची जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला धमकी


