राजकारणापासून दूर रहा, स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्या; निवडणुकीच्या आधी दंगल, हिंसाचाराची शक्यता, अमेरिकेचा बांगलादेशबाबत मोठा इशारा

Last Updated:

Bangladesh Elections: बांगलादेशात फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, अमेरिकेच्या दूतावासाने देशव्यापी सुरक्षा इशारा जारी केला आहे. निवडणुका जवळ येताच राजकीय रॅली आणि निदर्शनांमुळे हिंसाचाराचा धोका वाढू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

News18
News18
वॉशिंग्टन/ढाका: बांगलादेशात फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकांपूर्वी देशातील सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. ढाकास्थित अमेरिकेच्या दूतावासाने अमेरिकन नागरिकांसाठी देशव्यापी सुरक्षा इशारा जारी केला आहे. या अॅडव्हायझरीमध्ये अमेरिकन दूतावासाने स्पष्ट केले आहे की, जसे-जसे बांगलादेशातील निवडणुकांची तारीख जवळ येईल, तसतसे राजकीय सभा, मोर्चे आणि निदर्शनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
दूतावासाने इशारा दिला आहे की वरकरणी शांत वाटणारे कार्यक्रमही अचानक हिंसक वळण घेऊ शकतात. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, मोठ्या जमावांपासून आणि निदर्शनांपासून दूर राहावे. स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबाबत नेहमी जागरूक राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
advertisement
सुरक्षा इशारा अशा वेळी जारी करण्यात आल आहे, जेव्हा बांगलादेश निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकांचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला आहे. यावेळी देशातील सर्व 300 संसदीय मतदारसंघांसाठी मतदान होणार असून, त्याचबरोबर एक राष्ट्रीय जनमतसंग्रह (National Referendum) देखील घेतला जाणार आहे. बांगलादेशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदीय निवडणुका आणि राष्ट्रीय जनमतसंग्रह एकाच वेळी होणार आहेत. त्यामुळे या प्रक्रियेकडे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष लक्ष दिले जात आहे.
advertisement
फेब्रुवारी 2026 मधील ही निवडणूक राजकीयदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या मोठ्या विद्यार्थी आंदोलनानंतर होणारी ही पहिलीच राष्ट्रीय निवडणूक असेल. त्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारने देशाची सूत्रे हाती घेतली आहेत. जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवार 29 डिसेंबर 2025 रोजी आपले नामांकन अर्ज दाखल करतील. निवडणूक प्रचाराला 22 जानेवारी 2026 पासून सुरुवात होईल आणि मतदानाच्या 48 तास आधी प्रचार थांबवण्यात येईल.
advertisement
या संसदीय निवडणुकांसोबतच मतदारांना प्रस्तावित ‘जुलै चार्टर’वर राष्ट्रीय जनमतसंग्रहात सहभाग घ्यावा लागणार आहे. या चार्टरचा उद्देश देशातील राज्यसंस्थांमध्ये व्यापक सुधारणा घडवून आणणे हा आहे. कार्यपालिकेच्या अधिकारांवर मर्यादा घालणे, न्यायपालिकेची स्वायत्तता अधिक मजबूत करणे आणि सत्तासंतुलन राखणे यासारख्या तरतुदी या चार्टरमध्ये समाविष्ट आहेत. 2024 नंतर झालेल्या राजकीय बदलांचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, देशाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी हा जनमतसंग्रह निर्णायक ठरू शकतो.
advertisement
दरम्यान अमेरिकेच्या दूतावासाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अमेरिकन नागरिकांनी ढाकास्थित दूतावासाशी संपर्क साधावा. तसेच राजकीय हालचाली सुरू असलेल्या परिसरांपासून शक्यतो दूर राहावे आणि स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही दूतावासाने केले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/विदेश/
राजकारणापासून दूर रहा, स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्या; निवडणुकीच्या आधी दंगल, हिंसाचाराची शक्यता, अमेरिकेचा बांगलादेशबाबत मोठा इशारा
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement