advertisement

युद्धाचे चित्र एका झटक्यात बदलणार, इराणकडून परस्पर मोठी घोषणा; थेट अमेरिकेला दिली ऑफर, आता चेंडू व्हाईट हाऊसच्या कोर्टात

Last Updated:

US-Israel Iran War: पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र होत असताना इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अमेरिकेने समाधानकारक पर्याय दिल्यास अणुकार्यक्रम सोडण्याची तयारी असल्याचे इराणच्या उपमंत्र्यांनी स्पष्ट केले.

News18
News18
तेहरान: पश्चिम आशियात सुरू असलेल्या भीषण संघर्षाला सहा दिवस पूर्ण झाले असताना इराणने आपल्या अणुकार्यक्रमाबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. इराणच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केले की, योग्य आणि समाधानकारक पर्याय दिल्यासच इराण आपला अणुकार्यक्रम सोडण्याचा विचार करू शकतो.
माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अमेरिका जर इराणच्या सुरक्षेच्या आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने विश्वासार्ह आणि समाधानकारक प्रस्ताव ठेवेल, तर ते अणुकार्यक्रमाचा त्याग करण्यास तयार आहेत. मात्र केवळ दबाव, निर्बंध किंवा धमक्यांमुळे इराण आपला अणुकार्यक्रम बंद करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या पश्चिम आशियात तणाव अत्यंत वाढलेला असून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे परिस्थिती अधिक चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या या विधानाकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे. अनेक देशांना भीती आहे की हा संघर्ष आणखी वाढल्यास अण्वस्त्रांच्या स्पर्धेला चालना मिळू शकते.
advertisement
इराणने यापूर्वीही आपला अणुकार्यक्रम शांततापूर्ण उद्देशांसाठी असल्याचा दावा केला आहे. मात्र अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांनी इराणवर अण्वस्त्र विकसित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वारंवार केला आहे. त्यामुळेच इराणवर विविध आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते.
इराणच्या उपमंत्र्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे भविष्यात अमेरिका आणि इराण यांच्यात नव्या चर्चेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अमेरिका नेमका कोणता “समाधानकारक पर्याय” देऊ शकते, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या विधानानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात नवी घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
अमेरिका आणि इस्रायलने ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ नावाची संयुक्त लष्करी कारवाई सुरू केली होती. 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या या कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. इराणसोबत अणुकराराबाबत ओमानच्या मध्यस्थीने सुरू असलेली गुप्त चर्चा निष्फळ ठरल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जाते.
advertisement
वॉशिंग्टनच्या हेतूंवर शंका असतानाही त्यांनी अमेरिकेसोबत चर्चा सुरू ठेवली होती. मात्र ठरलेल्या वेळापत्रकापूर्वीच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप इराणने केला आहे. दरम्यान अमेरिकेने म्हटले आहे की इराणविरुद्ध सुरू असलेल्या या लष्करी कारवाईचे अंतिम उद्दिष्ट पश्चिम आशियातील परिस्थितीत असा बदल घडवणे आहे. ज्यामुळे हा प्रदेश जागतिक सुरक्षेसाठी धोका ठरणार नाही.
advertisement
अमेरिकेने असेही स्पष्ट केले की डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाची सध्याची भूमिका सुरुवातीपासूनच अशी नव्हती. इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत केलेले राजनैतिक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतरच ही कठोर भूमिका स्वीकारावी लागली. तसेच इराणने जर अण्वस्त्रांच्या उद्दिष्टांमध्ये यश मिळवले, तर ते जागतिक स्थैर्यासाठी गंभीर धोका ठरू शकते, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
युद्धाचे चित्र एका झटक्यात बदलणार, इराणकडून परस्पर मोठी घोषणा; थेट अमेरिकेला दिली ऑफर, आता चेंडू व्हाईट हाऊसच्या कोर्टात
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement