India and Pakistan: भारत पाकिस्तान वादात पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांची उडी; म्हणाले, दोन्ही देशांना मी व्यापाराची...
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Donald Trump: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धबंदी झाली असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शांतता प्रक्रियेत आपल्या प्रशासनाने मध्यस्थी केल्याचा पुन्हा एकदा दावा केला आहे.
वॉशिंग्टन: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी युद्धबंदी स्वीकारल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शांतता प्रक्रियेचे श्रेय पुन्हा एकदा स्वतःकडे घेतले आहे. अमेरिका-चीन व्यापार कराराच्या घोषणेदरम्यान बोलताना ट्रम्प यांनी दावा केला की त्यांच्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तान यांच्यात तात्काळ आणि कायमस्वरूपी युद्धबंदी घडवून आणली.
पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, ते (भारत आणि पाकिस्तानचे सैन्य) एकमेकांवर जोरदार हल्ला करत होते आणि ते थांबणार नाही असे दिसत होते. या युद्धबंदीचे श्रेय घेत ते पुढे म्हणाले, आम्ही अणुसंघर्ष थांबवला. मला वाटते की ते एक मोठे आणि वाईट अणुयुद्ध ठरू शकले असते. ज्यात लाखो लोक मारले गेले असते. त्यामुळे मला याचा खूप अभिमान आहे.
advertisement
#WATCH | अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने भारत-पाकिस्तान समझौते पर कहा, "...हमने परमाणु संघर्ष को रोका। मुझे लगता है कि यह एक बुरा परमाणु युद्ध हो सकता था। लाखों लोग मारे जा सकते थे। मैं उपराष्ट्रपति जेडी वेंस और विदेश मंत्री मार्को रुबियो को उनके काम के लिए धन्यवाद देना चाहता… pic.twitter.com/eCJ463oDXK
— ANI_HindiNews (@AHindinews) May 12, 2025
advertisement
युद्धा सुरू राहिल्यास व्यापार थांबवण्याची धमकी दिल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले, मात्र त्यांची ही टिप्पणी कोणाला उद्देशून होती, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलांना स्पष्ट निर्देश दिले होते की गोळीबाराला तोफखान्याने उत्तर दिले जाईल (वहाँ से गोली चलेगी, तो यहाँ से गोला चलेगा), असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
advertisement
भारताने काश्मीरच्या मुद्द्यावर कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची शक्यता स्पष्टपणे नाकारली आहे. भारताने म्हटले आहे की पाकिस्तानने त्यांच्या अवैध ताब्यात असलेले क्षेत्र परत करणे हा एकमेव प्रलंबित मुद्दा आहे.
शनिवारी सायंकाळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी घोषणा केली की भारत आणि पाकिस्तान भूभाग, हवाई आणि समुद्रावरील सर्व प्रकारच्या गोळीबार आणि लष्करी कारवाई त्वरित थांबवण्यास सहमत झाले आहेत. ही घोषणा चार दिवसांच्या तीव्र सीमापार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर आली.
advertisement
या युद्धबंदीचा उल्लेख सर्वप्रथम ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या केला होता आणि वॉशिंग्टनने या करारात मध्यस्थी केल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एक निवेदन जारी करून भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी पूर्ण युद्धबंदी स्वीकारली असून तटस्थ ठिकाणी विस्तृत चर्चा सुरू करतील, असे स्पष्ट केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 12, 2025 7:56 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
India and Pakistan: भारत पाकिस्तान वादात पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांची उडी; म्हणाले, दोन्ही देशांना मी व्यापाराची...


