US Election : ट्रम्प यांच्यासाठी मस्कने उघडली तिजोरी, दररोज 80000000 रुपये देण्याची घोषणा

Last Updated:

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी मस्कने पैसे वापरण्यास सुरुवात केली आहे. राजकीय निवडणुकीत असाधारणपणे संपत्तीचा वापर करण्याचं, हे ताजं उदाहरण आहे.

News18
News18
वॉशिंग्टन: येत्या 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेत राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळत आहे. अशातच अब्जाधीश उद्योजक एलॉन मस्क यांनी शनिवारी एक वचन देऊन खळबळ उडवून दिली आहे.
नोव्हेंबरमध्ये होणार्‍या निवडणुकीपर्यंत दररोज एक मिलियन अमेरिकी डॉलर्स देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या ऑनलाईन याचिकेवर सही करणार्‍याला हे पैसे मिळू शकतील. डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्यासाठीच्या पीएसी कार्यक्रमात हे बक्षीस दिलं जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं होतं पण आता हे बक्षीस देणं कायदेशीर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
पेनसिल्व्हेनियातील हॅरिसबर्ग येथे अमेरिका पीएसी कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला मस्कने एक मिलियन डॉलर्सचा चेक दिला आहे. ट्रम्प यांच्यासाठी समर्थक जमा करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांच्या मते, जॉन ड्रेहर नावाची व्यक्ती या कार्यक्रमाची विजेती होती.
मस्क पैशांच्या मदतीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांवर प्रभाव पाडत आहे का?
टेस्लाचे संस्थापक असलेल्या मस्क यांनी स्वत: ड्रेहरला चेक दिला. मस्क म्हणाले, "बाय द वे जॉनला याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तुमचं स्वागत आहे." ट्रम्प आणि त्यांची डेमोक्रॅटिक पक्षातील प्रतीस्पर्धी कमला हॅरिस यांच्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी मस्कने पैसे वापरण्यास सुरुवात केली आहे. राजकीय निवडणुकीत असाधारणपणे संपत्तीचा वापर करण्याचं, हे ताजं उदाहरण आहे.
advertisement
ट्रम्प यांना मदत करण्यासाठी मस्क यांनी अमेरिका पीएसी सुरू केली आहे. पीएसी ही एक राजकीय कृती संस्था आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षीय मोहिमेच्या समर्थनार्थ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ही संस्था मतदारांची जमवाजमव आणि नोंदणी करण्यात मदत करत आहे. पण, हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याची चिन्हं दिसत आहेत.
advertisement
मस्क यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो यांनी रविवारी एनबीसीच्या 'मीट द प्रेस' या सत्रात सांगितलं की, पेनसिल्व्हेनियामधील नोंदणीकृत मतदारांना पैसे देण्याची मस्क यांची योजना अतिशय चुकीची आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी याकडं लक्ष दिलं पाहिजे."
शनिवारी रात्री करण्यात आलेल्या या रोख पेमेंटच्या कायदेशीरपणाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण, निवडणूक कायद्याशी संबंधित तज्ज्ञांनी फेडरल कायद्यातील विविध तरतुदींकडे लक्ष वेधलं आहे. या तरतुदींमध्ये मतदारांना रोख पेमेंट करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
मराठी बातम्या/विदेश/
US Election : ट्रम्प यांच्यासाठी मस्कने उघडली तिजोरी, दररोज 80000000 रुपये देण्याची घोषणा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement