Indonesia Plane Viral Video: क्रॉसविंडने विमान जमिनीवर आपटणार...; पायलटने 163 जणांना मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढलं

Last Updated:

Indonesia Plane Viral Video: इंडोनेशियात बॅटिक एअरच्या विमानाचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. जोरदार वाऱ्यामुळे डगमगलेलं विमान पायलटनं अंतिम क्षणी नियंत्रणात घेत 163 जीव वाचवले.

News18
News18
जकार्ता: इंडोनेशियामधील सगळ्यात वर्दळीच्या विमानतळावर 163 प्रवाशांनी मृत्यू अगदी जवळू पाहिला. 27 जून रोजी Batik Air ची फ्लाइट PK-LDJ जकार्ताच्या Soekarno-Hatta International Airport वर लँड करत होती, तेव्हा एक जोरदार आणि अनपेक्षित क्रॉसविंडने विमानाला जोरात हलवून टाकलं. विमान हवेतच असताना जोरात डगमगलं आणि रनवेवरून घसरले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि जसा व्हिडीओ व्हायरल झाला.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसते की जोरदार पावसात विमान डावीकडे-उजवीकडे झुलतं आहे. जसं एखादं खेळणं हवेत झुलतंय. एक क्षणासाठी वाटलं की आता ते थेट जमिनीवर आपटणार. पण त्याच क्षणी... पायलटनं कमाल दाखवली.
advertisement
पायलटने 163 जीव
विमानात 157 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. पायलटनं शेवटच्या क्षणी नियंत्रण मिळवत रनवेवर पुन्हा ताबा मिळवला आणि सुरक्षित लँडिंग केली. इंडोनेशियाच्या Directorate General of Civil Aviation ने पायलटचे कौतुक केलं आणि म्हटलं, त्यांनी क्रॉसविंडच्या आव्हानाला प्रोफेशनल पद्धतीनं हाताळलं.
कोणतीही तांत्रिक हानी नाही
लँडिंगनंतर लगेच तांत्रिक टीमने तपास केला आणि असं आढळलं की विमानाला या घटनेत कोणतीही मोठी हानी झालेली नाही. नंतर हे विमान दुसऱ्या ठिकाणी हलवून सखोल तपासासाठी ठेवण्यात आलं.
advertisement
दोन आठवड्यांपूर्वी मोठा अपघात
या घटनेनं लोकांना अधिकच घाबरवलं आहे कारण याच्या फक्त दोन आठवड्यांपूर्वी 12 जून रोजी Air India चा Boeing 787-8 Dreamliner क्रॅश झाला होता. ज्यामध्ये 242 पैकी 241 लोकांचा मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी आजूबाजूला असलेल्या 19 लोकांचाही जीव गेला होता. आता पुन्हा एकदा बोइंगच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Indonesia Plane Viral Video: क्रॉसविंडने विमान जमिनीवर आपटणार...; पायलटने 163 जणांना मृत्यूच्या तोंडातून बाहेर काढलं
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement