advertisement

OMG! व्यक्तीच्या नाकातून काढल्या 150 जिवंत अळ्या, पाहून डॉक्टरही चक्रावले!

Last Updated:

तुम्ही इन्फेक्शनविषयी ऐकलं असेल. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन असतात. प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या गोष्टींचं इन्फेक्शन असतंच. मात्र बऱ्याचदा खूप वाईट प्रकारे इन्फेक्शन होतं आणि त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात.

व्यक्तीच्या नाकातून काढल्या 150 जिवंत अळ्या
व्यक्तीच्या नाकातून काढल्या 150 जिवंत अळ्या
नवी दिल्ली : तुम्ही इन्फेक्शनविषयी ऐकलं असेल. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन असतात. प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या गोष्टींचं इन्फेक्शन असतंच. मात्र बऱ्याचदा खूप वाईट प्रकारे इन्फेक्शन होतं आणि त्याचे वाईट परिणामही भोगावे लागतात. इन्फेक्शन झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात मात्र यावेळी समोर आलेली घटना खूपच धक्कादायक आहे. इन्फेक्शनमुळे एका व्यक्तीच्या नाकातून तब्बल 150 जिवंत किडे निघाले.
एका व्यक्तीच्या नाकातून डॉक्टरांनी तब्बल 150 जिवंत किडे काढले. ते व्यक्तीच्या नाकाचं मांस खाऊन जिवंत होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे व्यक्तीला याविषयी कानोकान माहिती नव्हती. त्याला काही जाणवलंही नाही.
समोर आलेली ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडामधील आहे. फर्स्ट कोस्टच्या अनुसार, रुग्णाची ओळख लपवण्यात आली आहे. व्यक्तीला अचानक नाकातून रक्त येऊ लागलं आणि त्रास होऊ लागला. यानंतर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी जेव्हा नाकाच्या आतील दृश्य पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांना डझभर किडे दिसले.
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं की, वेदनामुळे त्याचा चेहरा सुजला होता. बोलण्यातही त्रास होतो.भीतीची गोष्ट अशी होती की त्याच्या नाकात वाढणारे किडे त्याची दृष्टी हिरावून घेऊ शकत होते. यामुळे त्याचा जीवही जाऊ शकत होता.
डॉक्टर म्हणले, अळ्या रुग्णाच्या कवटीच्या अगदी वर आणि मेंदूच्या अगदी खाली होत्या. अळ्या तिथून जाऊन मेंदूपर्यंत पोहोचल्या असत्या तर त्याचा मृत्यू झाला असता. ऑपरेशननंतर, रुग्णानं सांगितले की त्याचा ट्यूमर 30 वर्षांपूर्वी काढला गेला होता आणि त्याच्या कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे संसर्ग पसरला असावा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
OMG! व्यक्तीच्या नाकातून काढल्या 150 जिवंत अळ्या, पाहून डॉक्टरही चक्रावले!
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement