मगरीच्या पोटात सापडल्या मौल्यवान वस्तू, PHOTO पाहून बसणार नाही विश्वास
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
मगर खूप धोकादायक प्राणी आहे. कारण तिच्या जबड्यात आलेली शिकार ती जिवंत माघारी जाऊ देत नाही. त्यामुळे मगरीच्या हल्ल्यातून सहसा कोणी वाचत नाही. मगरीची दहशतही खूप असते.
नवी दिल्ली : मगर खूप धोकादायक प्राणी आहे. कारण तिच्या जबड्यात आलेली शिकार ती जिवंत माघारी जाऊ देत नाही. त्यामुळे मगरीच्या हल्ल्यातून सहसा कोणी वाचत नाही. मगरीची दहशतही खूप असते. अशातच एक मगर खूप चर्चेत आली आहे. याचंही कारणही तसंच आहे. या मगरीच्या पोटातून काही मौल्यवान गोष्टी निघाल्या. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अमेरिकेतील नेब्रास्का येथील प्राणीसंग्रहालयातील मगरीच्या पोटातून काही मौल्यवान गोष्टी सापडल्या आहेत. मगरीच्या पोटातून 70 अमेरिकन नानी सापडली आहेत. हे पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.
advertisement
ही मगर 36 वर्षांची असून रुटिन चेकअपमध्ये मगरीच्या पोटात ही नाणी आढळली. याविषयी पोस्टही शेअर करण्यात आली आहे. Omaha's Zoo & Aquarium नावाच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल होतायेत.
रेडिओग्राफी करताना मगरीच्या पोटात ही धातूची नाणी दिसली. त्यानंतर मगरीवर शस्त्रक्रिया करुन पोटातून ही नाणी बाहेर काढली. पशुवैद्य असलेल्या क्रिस्टीना प्लॉग सांगतात की, ही नाणी कदाचित प्राणी संग्रहालयात आलेल्या पर्यटकांनी मगरीच्या ठिकाणी टाकली असावीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2024 7:36 PM IST








