बँकेतील 860000000 रुपयांना नाही वाली, अकाऊंटमध्ये असेच पडून; पैसे वाटण्यासाठी बँकेने लावला कॅम्प
- Published by:Priya Lad
Last Updated:
Customer Forget Money in Bank Account : थोडेथोडके नव्हे तर तब्बल 860000000 रुपये आहेत. जे अकाऊंटमध्ये असेच पडून आहेत. त्याला कुणी ग्राहकच नाही. हे पैसे देण्यासाठी बँक आता ग्राहक शोधत आहे. पैसे देण्यासाठी बँकेने चक्क कॅम्पच लावला.
प्रत्येकाचं बँक खातं असतं, जिथं पैसे जमा केले जातात आणि गरज पडल्यास काढले जातात. पण बँकेतील अशाच खात्याला कुणीच वाली नाही. तिथं थोडेथोडके नव्हे तर तब्बल 860000000 रुपये आहेत. जे अकाऊंटमध्ये असेच पडून आहेत. त्याला कुणी ग्राहकच नाही. हे पैसे देण्यासाठी बँक आता ग्राहक शोधत आहे. पैसे देण्यासाठी बँकेने चक्क कॅम्पच लावला.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील बँकेतील ही घटना आहे. लाखो खाती अशी आहेत जिथं लोकांनी पैसे जमा केले पण ते त्यांनी काढलेच नाही. यामुळे जिल्ह्यातील बँकांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. फिरोजाबाद लीड बँकेचे अधिकारी रमण कांत सिंग यांनी लोकल18 शी बोलताना सांगितलं की, फिरोजाबादच्या बँकांमध्ये लाखो लोकांची खाती आहेत, ज्यात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. लोकांनी खाती उघडली, पैसे जमा केले आणि नंतर ते विसरले. ही खाती बंद केलेली नाहीत.
advertisement
जर आपण सर्व बँकांचा एकत्रित विचार केला तर 3,30,000 खाती आहेत ज्यात एकूण अंदाजे 86 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सेव्हिंग अकाऊंट, करंट अकाऊंट, एफडी असे मिळून ही खाती आहेत ज्यात पैसे झाल्यापासून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
आता जर हे पैसे काढले गेले नाहीत तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ते जप्त करेल. परिणामी बँकेने भारत सरकारच्या 'माझी भांडवल, माझा हक्क' मोहिमेअंतर्गत दरब्राई येथील विकास भवन इथं लोकांसाठी एक कॅम्प लावण्याचा निर्णय घेतला. इथं लोकांनी त्यांच्या खाते तपशील, कागदपत्रांसह येण्यास सांगितलं.जर कुटुंबातील एखाद्याचे खातेदार मृत झाले असतील किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ते खाते चालवू शकत नसतील, तर कुटुंबातील कोणताही सदस्य इथं येऊन माहिती घेऊ शकतो. ज्यांचे पैसे असतील त्यांना ते पैसे मिळतील. बँक अशा ग्राहकांना त्यांचे पैसे काढण्यास पूर्ण मदत करेल, असं ते म्हणाले.
advertisement
हा कॅम्प 1 नोव्हेंबर रोजी लावण्यात आला होता. यानंतर पुढे काय झालं त्याबाबतची माहिती अद्याप आलेली नाही. ही माहिती मिळाली की नक्कीच आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण तुम्ही किंवा तुमचे आजोबा पणजोबा तर असे बँकेत पैसे ठेवून विसरलेले तर नाहीत ना?
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
November 02, 2025 3:05 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बँकेतील 860000000 रुपयांना नाही वाली, अकाऊंटमध्ये असेच पडून; पैसे वाटण्यासाठी बँकेने लावला कॅम्प


