आश्चर्यम! भूक लागली म्हणून खाल्लं अन् नशीबच पालटलं, क्षणात बनला करोडपती, पण कसा?

Last Updated:

Man won lottery after eating burger : बर्गर खाल्ल्यानंतर ही व्यक्ती करोडपती बनली आहे. वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे कसं काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.

News18
News18
नवी दिल्ली : आपण श्रीमंत व्हावं असं कुणाला वाटत नाही. पण पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. पण काही लोकांचं नशीब इतकं चांगलं असतं की ते काही क्षणात श्रीमंत होतात. असंच एकाच व्यक्तीचं नशीब फळफळलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही. बर्गर खाल्ल्यानंतर ही व्यक्ती करोडपती बनली आहे. वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे कसं काय, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल.
क्रेग हॅगी असं या व्यक्तीचं नाव आहे. जो यूकेतील लिस्कीर्ड इथं राहतो. 36 वर्षीय क्रेगला भूक लागली होती आणि तो बर्गर खाण्यासाठी घराबाहेर पडला. बर्गर खाऊन झाल्यानंतर त्याने वाटेत एक राष्ट्रीय लॉटरी स्क्रॅचकार्ड विकत घेतलं.
क्रेग म्हणाला की त्याने हे कार्ड फक्त मनोरंजनासाठी खरेदी केलं होतं आणि त्याला कोणत्याही बक्षीसाची अपेक्षा नव्हती. तरी त्याने ते कार्ड कुठे हरवू नये म्हणून सुरुवातीला शरीरावर चिकटवून ठेवलं. निघालं तेव्हा ते त्याने किचनमध्ये एका सॉसपॅनंध्ये लपवून ठेवलं.
advertisement
जेव्हा रिझल्ट्स लागला तेव्हा क्रेगला विश्वासच बसेना. त्याने 10 लाख पाऊंड म्हणजेच 11 कोटी 26 लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती. जेव्हा क्रेगने त्याच्या पत्नीला याबद्दल सांगितलं तेव्हा तिलाही विश्वास बसला नाही. आता पती-पत्नी पैशांचं काय करायच याचं प्लॅनिंग करण्यात बिझी आहेत. त्याची पत्नी भविष्यासाठी गुंतवणूक करू इच्छिते, तर क्रेग फक्त मनोरंजनासाठी काही पैसे खर्च करू इच्छितो.
advertisement
अशा विचित्र पद्धतीने लॉटरी जिंकण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. कुणी चालता चालता, कुणी कामावरून घरी परतताना, कुणी काही दुकानात आणायला गेलं तेव्हा टाइमपास म्हणून लॉटरीचं तिकीट काढलं आणि ते जिंकलं, अशी काही प्रकरणं याआधीही आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
आश्चर्यम! भूक लागली म्हणून खाल्लं अन् नशीबच पालटलं, क्षणात बनला करोडपती, पण कसा?
Next Article
advertisement
Raj Thackeray : बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
  • महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे.

  • मनसे मुंबईत उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी चर्चा

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

View All
advertisement