Do You Know : कधी पाहिलाय हिरव्या रंगाचा सूर्य? कुठे आणि का दिसतो असा? रंगामागचं कारण आश्चर्यचकीत करेल

Last Updated:

या रंगाबद्दल आणि त्यामागचं कारण ऐकाल तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आपल्यापैकी अनेकांनी शाळेत असताना निसर्गाचं चित्र काढलं असेल, ज्यामध्यै डोंगर, नद्या, झाडं, सुर्य आणि घर असतं. या चित्रांना रंग देखील भरलं असेल. अशावेळी आपण सुर्याला पिवळा रंग देतो किंवा कधीकधी भगवा रंग दिला जातो. यामागाचं कारण असं की आपण सर्वांनीच सुर्याचे लाल किंवा पिवळा असे दोनच रंग पाहिले आहेत. पण तुम्हाला माहितीय का की सुर्याचा आणखी एक रंग आहे. या रंगाबद्दल आणि त्यामागचं कारण ऐकाल तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. जगात एक देश असा आहे जिथे सुर्य हा हिरव्या रंगाचा दिसतो.
युरोपमधील नॉर्वे हा देश निसर्गाच्या अद्भुत चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे. येथे वाइट माउंटन, नॉर्दर्न लाईट्स नेहमीच लोकांना आश्चर्यचकीत करतात. पण एवढच नाही तर इथल्या हिरव्या सुर्यानं देखील लोकांना आश्चर्यचकीत केलं आहे.
नॉर्वेमध्ये सूर्य काही क्षणांसाठी हिरवा रंग धारण करतो. विज्ञानाच्या भाषेत या नैसर्गिक घटनेला ‘ग्रीन फ्लॅश’ असे म्हटले जाते.
फक्त काही सेकंदांचा खेळ
हिरवा सूर्य फार वेळ दिसत नाही. हा फक्त 2 ते 3 सेकंदांसाठीच दिसतो. शास्त्रज्ञांच्या मते, सूर्याच्या किरणांमध्ये अनेक रंग असतात. सूर्य क्षितिजावर असताना वातावरणातील प्रकाशाचे अपवर्तन होतं आणि त्या वेळी हिरवा आणि निळा रंग जास्त ठळकपणे दिसतो.
advertisement
हा नजारा कधी आणि कुठे पाहता येतो?
हिरवा सूरज दिवसभर दिसत नाही. तो पाहण्यासाठी तुम्हाला सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी समुद्र किनारी किंवा स्वच्छ, उंच जागी उभं राहावं लागतं. या घटनेचं निरीक्षण करण्यासाठी सोलर ग्लासेसचा वापर करणं योग्य ठरतं. कारण हा चमत्कार फक्त काही सेकंदांसाठीच दिसतो, त्यामुळे सूर्याच्या दिशेने एकटक नजर ठेवणं आवश्यक असतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Do You Know : कधी पाहिलाय हिरव्या रंगाचा सूर्य? कुठे आणि का दिसतो असा? रंगामागचं कारण आश्चर्यचकीत करेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement