advertisement

नेहमी डाव्या हातातच घड्याळ का घालतात? यामागे आहे वैज्ञानिक कारण

Last Updated:

यामागचं कारण आणि सायन्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हे जाणून घेण्यात मदत होईल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई, 28 नोव्हेंबर : आजकाल सगळेच लोक आपल्या हातात घड्याळ घालतात. काही फॅन्सी तर तर काही ऑफिशिअल अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हे घड्याळ असतात. परंतू तुम्ही जर नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बहुतांश लोक हे त्यांच्या डाव्या हातात घड्याळ घालतात. यासंबंधीत Quora वर प्रश्न विचारला गेला की लोक हे डाव्या हातातच घड्याळ का घालतात?
तर यामागचं कारण आणि सायन्स आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला हे जाणून घेण्यात मदत होईल.
खरंतर बहुतांश लोक हे उजव्या हाताने काम करतात. अशावेळी त्यांचा उजवा हात हा जास्तीत जास्त वेळ व्यस्त असतो. अशावेळी मोकळा असलेल्या डाव्या हातात तुम्ही वेळ पाहू शकता. त्यामुळे लोक त्यांच्या डाव्या हातात घड्याळ घालतात.
advertisement
जुन्या काळात, बरेच लोक त्यांची घड्याळे त्यांच्या मनगटावर ठेवण्याऐवजी त्यांच्या खिशात ठेवत असत.
दक्षिण आफ्रिकेतील शेतकरी संघर्षाच्या काळात ही परंपरा खूप लोकप्रिय झाली. बहुसंख्य उच्चभ्रू कुटुंबातील लोक आणि अधिकारी अशा प्रकारे घड्याळ आपल्या खिशात ठेवत. ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतू आता लोक ती घड्याळं हातात घालतात.
शास्त्रीय कारण जाणून घ्या
घड्याळ्याच्या वेळेची सुरुवात ही 12 पासून होते. म्हणजे सकाळची वेळ आणि रात्रीची वेळ ही 12 नंतर सुरु होते. त्यामुळे संख्यांचं वाचन 12 च्या पुढे उजवीकडून होते. त्यामुळे जर तुम्ही घड्याळ तुमच्या डाव्या हाताच्या ऐवजी तुमच्या उजव्या हाताला घातलं तर 12 चा आकडा खाली जाईल आणि क्रम उलटेल. अशा परिस्थितीत तुम्हाला रीडिंग घेण्यात अडचण येईल. जोपर्यंत स्वयंचलित घड्याळे प्रचलित होती, तोपर्यंत बरेच लोक ते दोन्ही हातांवर घालायचे.
advertisement
उजव्या हातात घड्याळ बांधल्यावर चावी आतल्या बाजूला राहते, त्यामुळे चावी भरण्यात अडचण येत होती, कारण उजव्या हातात बांधल्यावर ती आतील बाजूस वळते. ज्यामुळे लोक ते डाव्या हातात घालू लागले, तेव्हापासून हीच गोष्ट फॉलो केली जाते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
नेहमी डाव्या हातातच घड्याळ का घालतात? यामागे आहे वैज्ञानिक कारण
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement