Google : मुलाने गुगलला विचारला मुलींबाबत असा प्रश्न, 7 दिवस झाले उत्तरच संपेना
- Published by:Priya Lad
Last Updated:
Google Question : गुगलला मुलीबाबत प्रश्न विचारणाऱ्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तो मुलगा आपल्या भावाला याबाबत सांगतो.
नवी दिल्ली : सध्या कोणतीही माहिती हवी असेल तर आपण ती इंटरनेटवर शोधतो. इंटरनेट किंवा गुगलकडे प्रत्येक समस्येचं निराकारण आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे असं म्हणतात. असाच एक प्रश्न मुलींबाबत जो एका मुलाने गुगलला विचारला. गेली 7 दिवस झाले गुगल अजूनही उत्तर देत आहेत, त्याचं उत्तर संपतच नाही आहे, असं हा मुलगा म्हणाला.
गुगलला मुलीबाबत प्रश्न विचारणाऱ्या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत तो मुलगा आपल्या भावाला याबाबत सांगतो. त्याने गुगलला मुलींच्या इच्छांबाबत विचारलं. व्हिडिओमध्ये तो मुलगा त्याच्या भावाला सांगतो, "भाऊ, मी गुगलला विचारलं की मुलींच्या सर्व इच्छा काय असतात." यावर त्याचा भाऊ म्हणाला, "बरं, मग गुगलने काय म्हटलं?" तो मुलगा त्याच गंभीरतेने उत्तर देतो, "आज सातवा दिवस आहे भाऊ, गुगल शांत बसत नाहीये."
advertisement
गुगलने निराश केले आहे असे म्हटल्यानंतर, त्या मुलाचा चेहरा फिकट पडतो. त्याचा भाऊही निराश दिसतो. यानंतर, पार्श्वभूमीत दुःखद संगीत वाजू लागतं. व्हिडिओमधील या मुलाचे नाव मारुती आहे आणि तो या नावाने अशा अनेक मजेदार गोष्टी सांगत राहतो.
advertisement
Location :
Delhi
First Published :
August 25, 2025 8:59 AM IST


