लग्नानंतरची रात्र, नवरदेव आलाच नाही, रूममध्ये एकट्या नवरीने केलं असं काही किंचाळू लागली

Last Updated:

Wedding Story : लग्नाच्या रात्री वधू एकटी होती. कंटाळून तिने असं कृत्य केलं की ती ओरडू लागली. कुटुंबाला याबाबत समजताच त्यांनाही धक्का बसला.

News18
News18
तिरुवनंतपुरम : लग्न हा प्रत्येक मुलीसाठी सर्वात खास क्षण असतो, प्रत्येक मुलीला हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असावा असं वाटतं. इतर कोणत्याही मुलीप्रमाणेच केरळमधील एक नवविवाहित वधू तिच्या सासरच्या घरी खूप स्वप्ने घेऊन आली. पण लग्नाच्या दुसऱ्या रात्री जेव्हा तिनं तिच्या खोलीतील कपाटाचा दरवाजा उघडला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. चला तर मग संपूर्ण प्रकरण काय आहे ते सांगतो.
अर्चा एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. 1 मे रोजी तिचं लग्न ए.के.अर्जुन नावाच्या तरुणाशी झालं. लग्नानंतर सासरी आलेल्या अर्चाने तिचे दागिने काढून पिशवीत ठेवले आणि पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये कपड्याच्या कपाटात ठेवले. रात्री 9 च्या सुमारास, अर्चाने कपाट उघडलं तेव्हा तिला लक्षात आलं की दागिने गायब आहेत.
advertisement
दागिन्यांची किंमत सुमारे 22 लाख रुपये होती. अर्चाच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. त्यांनी सर्व पाहुण्यांची यादी बनवली आणि शोध सुरू केला. पण काहीच सुगावा लागला नाही.
पण दोन दिवसांनी असं काही घडलं की सर्वांनाच धक्का बसला. 7 मे रोजी सकाळी जेव्हा पोलीस पुन्हा एकदा घराभोवती तपासणी करत होते, तेव्हा घरापासून फक्त दोन मीटर अंतरावर झुडपांमध्ये एक पांढरी कापडी पिशवी आढळली. खरं तर, चोराने लग्नाच्या दिवशी चोरीला गेलेले सर्व दागिने दोन दिवसांनी घराजवळ पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवले. ज्यामध्ये बांगड्या, हार, बेल्ट, अंगठ्या, कानातले सर्वकाही शाबूत होतं.
advertisement
पोलीस उपनिरीक्षक सनीथ सी. म्हणाले, 'एकही दागिना हरवला नव्हता.' चोराने पश्चात्ताप किंवा भीतीपोटी दागिने परत केले आहेत असं दिसतं. फिंगरप्रिंट टीमने बॅग आणि दागिन्यांमधून नमुने गोळा केले आहेत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे बोटांचे ठसे देखील घेतले जात आहेत.
view comments
मराठी बातम्या/Viral/
लग्नानंतरची रात्र, नवरदेव आलाच नाही, रूममध्ये एकट्या नवरीने केलं असं काही किंचाळू लागली
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement