बापरे! मेणबत्ती पेटवली आणि बॉम्बसारखा फुटला केक, पण कसं काय? Watch Video

Last Updated:

Cake Blast Like Bomb : काही मित्र त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक केक घेतात. सगळे हसत हसत बर्थडे बॉयला केक कापण्यासाठी आमंत्रित करतात. सगळं अगदी सामान्य वाटतंय, पण खरा धोका केकमध्येच लपलेला आहे.

News18
News18
नवी दिल्ली : बर्थ डे सेलिब्रेशनचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बर्थडे साजरा करायचा म्हणजे केक आलाच. पण हाच केक बॉम्ब बनला तर... वाचूनच धक्का बसला ना? पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. एक बर्थडे केक चक्क बॉम्बसारखा फुटला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि धोकादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. बर्थडे सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ. आता तुम्ही म्हणाल हा व्हिडीओ कसा काय धोकादायक असेल. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये एक चक्क बॉम्बसारखा फुटला आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता काही मित्र त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक केक घेतात. सगळे हसत हसत बर्थडे बॉयला केक कापण्यासाठी आमंत्रित करतात. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, त्याचं कौतुक करतात, त्याच्या गळ्यात पुष्पहार घालतात, त्याला खांद्यावर घेऊन नाचतात... सगळं अगदी सामान्य वाटतंय, पण खरा धोका केकमध्येच लपलेला आहे.
advertisement
केकवर मेणबत्ती पेटवल्या जातात आणि हे काय केक चक्क बॉम्बसारखा फुटला. सुदैवाने त्याच क्षणी सगळे केकपासून लांब पळाले म्हणून कुणाला दुखापत झाल्याचं या व्हिडीओत तरी दिसत नाही. आता हे कसं काय झालं? केकचा ब्लास्ट कसा काय झाला? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
तुम्ही व्हिडीओ नीट पाहाल तर तुम्हाला दिसेल की बर्थडे बॉयचे मित्र केक घेतात, त्यानंतर  ते फटाके घेतात. फटाके केकच्या आत अशा पद्धतीने लपवतात की ते दिसले नाही पाहिजे. बाजूने  पूर्ण क्रिमने कव्हर करतात. जशी केकवर मेणबत्ती लागते तसा फटाका पेटतो आणि केकसकट फुटतो. मोठा स्फोट होतो.
स्फोट इतका शक्तिशाली होता की तिथे असलेले लोक घाबरून लगेच मागे पळाले. हा अपघात खूप गंभीर असू शकतो, चेहऱ्यावर भाजणे, डोळ्यांना दुखापत होणे किंवा कपड्यांना आग लागणे, परंतु सुदैवाने, कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.
advertisement
व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे माहिती नाही. पण तो ganesh_shinde8169 या इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केलेला करण्यात आला आहे. जो लाखो लोकांनी पाहिला आहे. बहुतेक युझर्सनी या  कृत्यावर संताप व्यक्त केला आहे. त्याला धोकादायक, प्राणघातक, बेजबाबदार मस्करी म्हटलं आहे.
advertisement
advertisement
एका युझरने लिहिलं, "हे मित्र नाहीत, तर असे विनोद करणारे शत्रू आहेत." दुसऱ्याने इशारा दिला, "अशा मूर्ख कृत्यांमुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं"
view comments
मराठी बातम्या/Viral/
बापरे! मेणबत्ती पेटवली आणि बॉम्बसारखा फुटला केक, पण कसं काय? Watch Video
Next Article
advertisement
Eknath Shinde Ravindra Chavan: व्यासपीठावर केमिस्ट्री दिसली पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, नेमकं घडलं काय?
व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय
  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

  • व्यासपीठावर केमिस्ट्री पण भाषणात सूर जुळेना, शिंदे-चव्हाण एकाच मंचावर, घडलं काय

View All
advertisement