रसगुल्ल्यामुळे मोडलं लग्न! वधू आणि वरपक्षांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, प्रकरण पोलिसात
- Published by:Priya Lad
Last Updated:
Fight For Rasgulla In Wedding : एका खाजगी हॉटेलमध्ये हा लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. जिथं रसगुल्ला नसल्यावरून वधू आणि वर पक्षात भांडण झालं. लग्न रद्द करण्यात आलं.
पाटणा : लग्न म्हटलं की जेवण आलं आणि लग्नाचं जेवण म्हणजे गोड पदार्थ. कुठे जिलेबी, कुठे गुलाबजामुन, कुठे बासुंदी तर कुठे रसगुल्ला असतो. लग्नाच्या जेवणात असाच रसगुल्ला नाही म्हणून मंडपातच राडा झाला आहे. वधू आणि वरपक्ष आपसात भिडले आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या आहेत. शेवटी हे लग्नच रद्द झालं आणि प्रकरण पोलिसात पोहोचलं आहे.
बोधगया येथील एका खाजगी हॉटेलमध्ये हा लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. जिथं रसगुल्ला नसल्यावरून वधू आणि वर पक्षात भांडण झालं. लग्न रद्द करण्यात आलं. माहितीवरून लग्नाची सगळी व्यवस्था वरपक्षाने केली होती. वधूपक्षा तिथं वराच्या स्वागतासाठी आधी पोहोचला होता. लग्नाच्या काही विधी झाल्या. नंतर जेवण सुरू झालं. जेवणात रसगुल्ला नाही यावरून वाद सुरू झाला आणि हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला.
advertisement
वधूच्या कुटुंबाने बोधगया पोलीस ठाण्यात धाव देतली आणि वराच्या वडिलांविरुद्ध हुंड्याची तक्रार दाखल केली. वधूच्या वडिलांनी आरोप केला की लग्नासाठी 10 लाख रुपये आधीच देण्यात आले होते, पण वरमाला घालण्याच्या समारंभात अतिरिक्त 2 लाख रुपये मागितले गेले, ज्यामुळे प्रकरण आणखी वाढलं. वधूच्या बाजूने बोधगया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
बिहार में बोधगया के एक होटल में शादी समारोह में रसगुल्ले को लेकर बवाल हो गया. यहां दूल्हा और दुल्हन पक्ष के बीच जमकर मारपीट हो गई. पूरी घटना सीसीटीवी में कैद हो गई है. वीडियो में देखा जा सकता है कि किस तरह लोग एक-दूसरे पर कुर्सियों, बर्तनों से हमला कर रहे हैं. घटना के बाद दुल्हन… pic.twitter.com/xNbi7sEZUt
— Matrize News Communications Pvt. Ltd (@Matrize_NC) December 4, 2025
advertisement
तर वराचे वडील महेंद्र प्रसाद म्हणाले की, हा वाद फक्त रसगुल्ल्यावरून होता, पण वधूच्या कुटुंबाने बोधगया पोलीस ठाण्यात हुंडा मागण्याचा खोटा आरोप करत खटला दाखल केला आहे. खटला दाखल झाल्यानंतरही ते लग्न करण्यास तयार होते, पण वधूच्या कुटुंबाने कोणत्याही परिस्थितीत नकार दिला. दरम्यान वराची आई मुन्नी देवी यांचा आरोप आहे की जेव्हा दोन्ही पक्षांमध्ये तडजोड होण्याची शक्यता होती, तेव्हा वधूच्या कुटुंबाने लग्नासाठी असलेले दागिने घेतले आणि वधूसह हॉटेलमधून निघून गेले.
advertisement
ही घटना 29 नोव्हेंबर रोजी घडली असल्याचं वृत्त आहे आणि या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. दोन्ही पक्षांच्या तक्रारींनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Bihar
First Published :
December 04, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/Viral/
रसगुल्ल्यामुळे मोडलं लग्न! वधू आणि वरपक्षांनी एकमेकांवर फेकल्या खुर्च्या, प्रकरण पोलिसात


