VIDEO : डोक्यावर घुंघट आणि हातात गिटार! एका रात्रीत VIRAL झालं नव्या नवरीचं गाणं, एकदा ऐकाच
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bride Song Video : घुंघट घेतलेली ही पारंपारिक वधू आणि तिच्या हातात गिटार अशी तिची मॉडर्न स्टाईल. तिला पाहून ही काय गिटार वाजवणार असं कित्येकांना वाटलं असेल. पण...
नवी दिल्ली : नवीन नवरी म्हटली की शक्यतो तिच्या तोंडून तुम्ही आजवर उखाणा ऐकला असेल. पण सध्या अशा एका नवरीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जी हातात गिटार घेऊन गाणं गाताना दिसली आहे. नव्या नवरीच्या आवाजातील असं गाणं की रातोरात व्हायरल झालं आहे.
नवीन नवरी आली की तिला पाहण्यासाठी महिलांची अक्षरश: गर्दी असते. अशाच गर्दीने वेढलेली ही नववधू. सगळ्या महिलांच्या मधे बसलेली. तिच्या डोक्यावर घुंघट आहे. आता अशी घुंघट घेतलेली नवरी एरवी तुम्हाला शांत दिसेल, लाजताना दिसेल. पण ही नवरी मात्र हातात गिटार घेऊन बसली आहे.
advertisement
ती गिटार वाजवायला सुरुवात करते. त्यानंतर ती गाणं गाऊ लागते. तेरा मेरा प्यार अमर असे गाण्याचे बोल. घुंघट घेतलेली ही पारंपारिक वधू आणि तिच्या हातात गिटार अशी तिची मॉडर्न स्टाईल. तिला पाहून ही काय गिटार वाजवणार असं कित्येकांना वाटलं असेल. पण जसं ती गिटार वाजवायला सुरुवात करते तसे सगळे थक्क होतात. त्यानंतर तर लोक आणखी आश्चर्यचकीत होतात जेव्हा ती गाणं गायला सुरुवात करते. तिचा आवाज इतका गोड आहे की डोळे बंद करून ऐकले तर एखादी गायिकाच गाणं गात असावी असं वाटेल.
advertisement
तेरा मेरा प्यार अमन हे गाणं ही नवरी गाताना दिसते. तिच्या आजूबाजूच्या महिलाही तिच्याकडे टकामका पाहतच राहतात.
advertisement
इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. बहुतेकांनी महिलेच्या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. एका युझरने तर रॉकस्टार सून अशी कमेंट केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
December 03, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : डोक्यावर घुंघट आणि हातात गिटार! एका रात्रीत VIRAL झालं नव्या नवरीचं गाणं, एकदा ऐकाच


