वाघालाही जमलं नाही ते 'वाघाच्या मावशी'ने करून दाखवलं; मांजर-मगरीचा लय डेंजर VIDEO

Last Updated:

मगर जी इतकी खतरनाक, तिच्या शिकारीची पद्धत इतकी भयानक की तिच्यासमोर वाघ, सिंह, बिबट्या असे शक्तिशाली प्राणीही टिकत नाही. तिच्या तावडीत सापडल्यावर यांचीही सुटका होत नाही. त्यांचा मृत्यू निश्चित असतो. अशा खतरनाक मगरीसमोर मांजर आली तर…

मांजर-मगरीचा व्हिडीओ
मांजर-मगरीचा व्हिडीओ
वॉशिंग्टन : मांजर जिला कुणी भिगी बिल्ली तर कुणी वाघाची मावशी. पण ती भिगी बिल्ली नाही तर वाघाचीच मावशी आहे आणि वाघापेक्षाही हिंमतवाली हे तिने सिद्ध करून दाखवलं आहे. वाघाच्या मावशीने असं काम करून दाखवलं आहे, जे वाघाला काय सिंह, बिबट्या असा कोणत्याच प्राण्यांना कधी जमलं नाही, कदाचित तेसुद्धा हे पाहून थरथर कापतील. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तिने चक्क मगरीच्या तोंडचा घास पळवला आहे. मांजर आणि मगरीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
मगर जी इतकी खतरनाक, तिच्या शिकारीची पद्धत इतकी भयानक की तिच्यासमोर वाघ, सिंह, बिबट्या असे शक्तिशाली प्राणीही टिकत नाही. तिच्या तावडीत सापडल्यावर यांचीही सुटका होत नाही. त्यांचा मृत्यू निश्चित असतो. अशा खतरनाक मगरीसमोर मांजर आली तर… तिचं काय चालेल, असंच आपण म्हणू. पण एका मांजरीने अशाच खतरनाक मगरीशी पंगा घेतला. तोही इतका डेंजर की तिने चक्क त्याच्या जबड्यात आपला हात टाकला.
advertisement
 मांजरीनं पळवला मगरीच्या तोंडातील तुकडा
मांजर आणि मगरीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता मांजर आणि मगर आमनेसामने आहेत. मगरीचं तोंड उघडं आहे. मांजर मगरीच्या तोंडात वाकून बघते आणि हळूच आपला एक हात त्याच्या तोंडात टाकते. त्यानंतर ती त्याच्या तोंडात दातात अडकलेलं मांस आपल्या पंजांनी बाहेर काढते. त्याक्षणी आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. कारण आता या मांजरीचं काही खरं नाही. ती या मगरीची शिकार झालीच असं वाटतं. पण घडतं मात्र उलटंच. मांजर मगरीच्या तोंडातून मांसाचा तुकडा घेऊन दूर जाते. मगर मात्र काहीच करत नाही.
advertisement
Instagram comedy_reels_meme वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला मांजरीसमोर वाघच भिगी बिल्ली वाटेल. इतकं डेंजर काम या साध्या मांजराने केलं आहे. मांजरीच्या हिमतीचं सर्वांनी कौतुक केलं आहे.
इथं पाहा व्हिडीओ
advertisement
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या/Viral/
वाघालाही जमलं नाही ते 'वाघाच्या मावशी'ने करून दाखवलं; मांजर-मगरीचा लय डेंजर VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement