…म्हणून त्या आजी-आजोबांकडून पैसे न घेता मंगळसूत्र दिलं, ज्वेलर्सचं उत्तर तुमचं मन जिंकेल!

Last Updated:

Grandparents Viral Video: 93 वर्षांचे आजोबा आपल्या पत्नीसाठी मंगळसूत्र खरेदीला एका ज्वेलरी शॉपमध्ये गेल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या दुकानदाराने पैसे न घेता मंगळसूत्र दिलंय.

…म्हणून त्या आजी-आजोबांकडून पैसे न घेता मंगळसूत्र दिलं, ज्वेलर्सचं उत्तर तुमचं मन जिंकेल!
…म्हणून त्या आजी-आजोबांकडून पैसे न घेता मंगळसूत्र दिलं, ज्वेलर्सचं उत्तर तुमचं मन जिंकेल!
आपल्या पत्नीला एखादा दागिना घेऊन देण्यासाठी नव्वदीपार आजोबा एका ज्वेलरी शॉपमध्ये गेले. छत्रपती संभाजीनगरमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अवघा महाराष्ट्र गहिवरला. हा व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिला आणि त्याच्यावर हजारो कमेंट्स देखील आल्या. या व्हीडिओत एका ज्वेलर्सच्या मालकानं त्यांना मंगळसूत्र पैसे न घेता दिल्याचं दिसतंय. याचीच इनसाईड स्टोरी लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
छत्रपती संभाजी नगर शहरातील औरंगपुरा भागांमध्ये गोपीका ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये एक आजी आजोबा सोनं खरेदीसाठी आले होते. या ठिकाणी त्यांच्यात झालेला संवाद दुकानाचे मालक निलेश खिवांसरा यांनी मोबाईल कॅमेरात कैद केला आणि तो समाज माध्यमांवर व्हायरल झाला.

advertisement
निलेश सांगतात की, “सर्वात पहिले ते आजी-आजोबा आमच्या पहिल्या दुकानात आले होते. त्या ठिकाणी ते मंगळसूत्र बघत होते. मी त्यांच्याशी संवाद साधला आणि कामानिमित्त बाहेर आलो. मी परत दुकानात पोहोचण्यापूर्वीच आजी-आजोबा निघून गेले होते. त्यांच्याशी बोलता न आल्यानं मला वाईट वाटलं.”

“मी दुसऱ्या दुकानात आलो असता त्या ठिकाणी तेच आजी-आजोबा आल्याचे दिसले. आजोबा आजीसाठी मंगळसूत्र बघत होते. त्यांना एक मंगळसूत्र आडलं होतं, त्याची किंमत त्यांनी विचारली आणि जवळचे पैसे काढून दिले. तेव्हा मी एवढे पैसे नको म्हणून सांगितलं. परंतु, त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांना वाटलं की मला अजून पैसे पाहिजेत. त्यांनी आजीकडून पैसे मागून घेतले आणि मला दिले,” असं निलेश सांगतात.

आजी-आजोबांकडे मिळून बाराशे ते तेराशे रुपये पहोते. पण मी ते पैसे घेतले नाही. तर त्यांना माळ आणि मंगळसूत्राच्या वाट्या तशाच देऊन टाकल्या. पण ते दोघे तसं घ्यायला तयार नव्हते. म्हणून मी त्यांच्याकडून वीस रुपये घेतले आणि ते पैसे मी अजून सुद्धा जपून ठेवल्याचं निलेश सांगतात.

“मी जेव्हा त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत, तेव्हा ते दोघेही भाऊक झाले. त्यांनी त्यांच्या मृत मुलाची आठवण काढली. तेव्हा मी ‘आजी आजोबांचं तुमच्यावरती प्रेम आहे का?’ असं प्रश्न केला. त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली आणि दोघे हसायला लागले. हे बघून मला सुद्धा खूप आनंद झाला, असंही निलेश यांनी सांगितले.

सदर आजी आजोबा हे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी आहेत. गजानन महाराज मंदिर परिसरात हे आजी आजोबा भीक मागून उदरनिर्वाह करतात. शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असं त्यांचं नाव आहे. आता त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासठी देखील जात आहेत.

view comments
मराठी बातम्या/Viral/
…म्हणून त्या आजी-आजोबांकडून पैसे न घेता मंगळसूत्र दिलं, ज्वेलर्सचं उत्तर तुमचं मन जिंकेल!
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement