अबब! कापसासारखे दिसणारे ढग, पण 100 हत्तींइतकं असतं वजन, मग खाली पडत कसे नाहीत?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Cloud weight : जेव्हा पृथ्वीवरून ढग दिसतात तेव्हा आपल्याला वाटतं, की ते वजनाला फार हलके असतील. कारण, ते वाऱ्याच्या मदतीने अगदी सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. प्रत्यक्षात ढग किती तरी पट जड असतात.
मुंबई : पावसाळ्यात आकाशाकडे पाहिलं की तिथे पाण्याने भरलेले काळे ढग दिसतात. या दिवसांत दिसणारे आकाशातले काळे ढग भरपूर पाण्याने भरलेले असतात आणि त्यांचं वजन किंवा थेंबांची घनता एका सीमेपलीकडे वाढू लागते. मग पाऊस पडतो. ते कोणत्या प्रकारचा आणि किती पाऊस पाडणार आहेत हे बऱ्याचदा ढगांवर अवलंबून असतं. या ढगांमध्ये किती पाणी असतं, ते पाण्याने भरल्यावर त्यांचं वजन किती असतं, याचा तुम्हाला अंदाज आहे का? या ढगांमध्ये इतकं पाणी असतं, की ते संपूर्ण शहर पाण्याने भरू शकतात. मग इतके वजनदार ढग खाली कसे पडत नाहीत? असा प्रश्न येतोच.
सर्वांत आधी ढग म्हणजे काय, त्यांची निर्मिती कशी होते ते पाहुयात. ते माहिती असायला हवं. ढग पाण्याच्या मोठ्या फुग्यांसारखे असतात. हवेत सर्वत्र पाण्याची वाफ आहे. म्हणजेच आपल्या अवतीभोवती वायूच्या स्वरूपात पाणी अस्तित्वात आहे. ते आपल्याला दिसत नाही. जेव्हा पाण्याची वाफ असलेली गरम हवा जमिनीपासून वर जाते तेव्हा ती थंड होऊ लागते. थंड झालेल्या वाफेची घनता वाढत जाऊन ढग तयार होऊ लागतात.
advertisement
ढग पाणी लपवतात कसं?
ढगांमध्ये भरपूर पाणी असतं. ढग आपल्या आत पाणी कसं लपवतात या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. ढग बादल्यांसारखे नसतात. आपल्या सभोवतालची हवा पाण्याने भरलेली आहे. पाणी तीन स्वरूपात असतं. द्रव (पिण्यायोग्य), घन (बर्फ) आणि वायू (हवेतली आर्द्रता). ढगातल्या पाण्याचं प्रमाण सभोवतालच्या हवेतल्या पाण्यापेक्षा वेगळं नसतं. ढगाच्या आतल्या थंड तापमानामुळे ही आर्द्रता किंवा वाफ द्रवात बदलते. हे द्रव ढगांमध्ये लाखो, अब्ज किंवा अगदी त्याहून जास्त पाण्याच्या थेंबांच्या रूपात असतात. शास्त्रज्ञ या प्रक्रियेला कन्डेन्सेशन म्हणतात. हे पाणी पावसाच्या रूपात जमिनीवर पडेल की नाही, हे अनेक घटकांवर अवलंबून आहे. ढगाच्या संपर्कातले थेंब लहान असतात. त्यांचं वजन खूपच कमी असतं. त्यामुळे ते हवेबरोबर तरंगत राहतात.
advertisement
ढगांचं वजन किती?
जेव्हा पृथ्वीवरून ढग दिसतात तेव्हा आपल्याला वाटतं, की ते वजनाला फार हलके असतील. कारण, ते वाऱ्याच्या मदतीने अगदी सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. प्रत्यक्षात ढग किती तरी पट जड असतात.
ढग प्रामुख्याने सिरस, क्युमुलस आणि स्ट्रेटस या तीन प्रकारचे असतात. ढगांचं स्वरूप आणि आकाराच्या आधारे ही नावं ठेवण्यात आली आहेत. उंचावर उडणाऱ्या सर्वांत सामान्य ढगांना सिरस म्हणतात. सिरस म्हणजे वर्तुळाकार. हे दररोज आकाशात दिसतात. हे ढग हलके असतात व बर्फाच्या कणांपासून बनलेले असतात. उन्हाळ्यात दिसणाऱ्या ढगांमध्येही बर्फाचे कण असतात. कारण त्या उंचीवर खूप थंडी असते.
advertisement
क्युमुलसचा अर्थ ढीग असा होतो. त्यांच्या नावाप्रमाणेच हे ढग कापसाच्या ढिगाप्रमाणे दिसतात. ते गडद रंगाचे असतात तेव्हा यातून पाऊस किंवा गारपीट होऊ शकते. अशा ढगांना क्युम्युलोनिम्बस म्हणतात. यामध्ये अनेकदा अर्धा कोटी टनहून अधिक पाणी असतं.
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, एक चौरस मैल क्षेत्रावर पडणारा एक इंच पाऊस 17.4 मिलियन गॅलन पाण्याइतका असतो. या पाण्याचे वजन अंदाजे 143 मिलियन पौंड असतं. म्हणजे ते शंभर हत्तींच्या वजनाएवढं आहे. आता तुम्हीच कल्पना करू शकता की जेव्हा ढग तरंगतात तेव्हा ते हलके नसतात तर त्यात खूप वजन असतं.
advertisement
शास्त्रज्ञांच्या मते, एका क्युम्युलस ढगाचं सरासरी वजन 1.1 मिलियन पौंड असतं. म्हणजे मान्सून आल्यावर कोणत्याही क्षणी तुमच्या डोक्यावर लाखो पौंड पाणी तरंगत असतं. हे पाणी 100 हत्तींएवढ्या वजनाचं असतं. ढग पाण्याच्या किंवा बर्फाच्या हजारो लहान कणांनी बनलेले असतात. हे लहान कण इतके हलके असतात की ते हवेत सहज उडतात.
क्युम्युलस ढगाचं सरासरी वजन अंदाजे 1.1 मिलियन पौंड किंवा 500,000 किलोग्रॅम असू शकतं. सामान्य क्युम्युलस ढगाची लांबी, रुंदी आणि उंची सुमारे 1 किलोमीटर (1000 मीटर) असते. त्यामुळे त्याचा आकार घन असतो. 1 घन किमी ढगाचं घनफळ 1 अब्ज घनमीटर (1000 मी x 1000 मी x 1000 मी = 1,000,000,000 m³) असतं. क्युम्युलस ढगांमध्ये पाण्याच्या थेंबांची घनता अंदाजे 0.5 ग्रॅम प्रति घनमीटर असते.
advertisement
ढगाचा व्हॉल्युम (1 बिलियन चौरस मीटर), पाण्याची घनता (0.5 ग्रॅम/घन मीटर) यांचा गुणाकार केल्यास ढगातल्या पाण्याचं एकूण वजन मिळतं. ते 500 मिलियन ग्रॅम किंवा 500,000 किलोग्रॅम असतं.
थंडरस्टॉर्म ढग (क्युम्युलोनिम्बस) खूप मोठे असतात. त्यामध्ये जास्त पाणी असतं. त्यांचं वजन सुमारे 2 मिलियन टन असतं.
उच्च उंचीचे सिरस ढग खूप हलके असतात. कारण त्यात प्रति युनिट व्हॉल्यूम कमी पाणी असतं. ढगातल्या हवेचं वजनदेखील महत्त्वाचं आहे. एकूण वजनात लाखो टनांची भर पडते.
advertisement
हजारो टन वजन असूनही ढग खाली का पडत नाहीत?
अगदी आकाशात उडणारं विमान क्रॅश झालं तरी त्याचे अवशेष जमिनीवरच पडतात. अशा स्थितीत प्रश्न पडतो, की ढगांना न्यूटनचा नियम का लागू होत नाही? हजारो टन वजन असूनही ढग खाली का पडत नाहीत? याबाबत जाणून घेऊ या.
गंमत म्हणजे ढगांवरदेखील गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होतो. गुरुत्वाकर्षाणुळे ढग खूप हळू खाली येतात; पण त्यांना थोडासा वारा लागला की ते पुन्हा वर जातात. त्यांच्या खाली येण्याचा वेग फारच कमी आहे. शिवाय, ते पृथ्वीपासून जास्त अंतरावर असतात. त्यामुळे ते आपल्याला खाली येताना दिसत नाहीत. ढगांमधल्या पाण्याच्या थेंबांचा आकार वाढल्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा विजय होतो आणि ते पाणी पावसाच्या रूपात खाली पडतं.
view commentsLocation :
Delhi
First Published :
May 30, 2025 11:17 AM IST


