हा माणूस जिथं जायचा तिथं पडायचा पाऊस, अजूनही उलगडलं नाही 'रेन मॅन'चं रहस्य
- Published by:Priya Lad
Last Updated:
Rain man : द रेन मॅन, असा माणूस जो कुठेही, कधीही पाऊस पाडू शकत होता. आश्चर्य म्हणजे या पावसात त्याच्याशिवाय दुसरं कुणीच भिजत नसे.
वॉशिंग्टन : पाऊस कसा पडतो असं विचारलं तर कुणीही सांगेल जमिनीवरील पाण्याची वाफ होते, ती ढगात जाऊन त्याचे ढग होतात आणि नंतर या ढगांमधून पाऊस पडतो. ढगांमुळे कोसळणारा हा पाऊस तुम्ही पाहिला आहे पण कधी कोणत्या माणसामुळे पाऊस पडल्याचं तुम्ही ऐकलं तरी आहे का? असा माणूस जो कुठेही, कधीही पाऊस पाडू शकत होता. शेवटी तो द रेन मॅन म्हणून प्रसिद्ध झाला. या रेन मॅनचं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही.
अमेरिकेतील डोनाल्ड उर्फ डॉन डेकर नावाची व्यक्ती. चोरीच्या आरोपात तुरुंगात शिक्षा भोगत होती. त्याचवेळी त्याच्या आजोबांचा मृत्यू झाला म्हणून अंत्यसंस्कारासाठी त्याला जेलमधून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी तो आपल्या एका मित्राच्या घरी थांबला. तिथं आणखी काही लोकही होते. त्यावेळी त्या घरात छत गळू लागलं. सर्वांनी घऱाची नीट पाहणी केली तर घरात बाहेरून पाणी येईल, पाण्याची गळती होईल अशी कोणतीच जागा नव्हती. पाणी तिथंच गळत होतं, जिथं डॉन डेकर बसला होता. तो घरातून बाहेर येताच पाणी गळणं थांबलं आणि सर्व नीट झालं.
advertisement
जिथं जायचा तिथं पाऊस
त्यानंतर पुन्हा अशीच घटना घडली ती रेस्टॉरंटमध्ये. तो तिथं बसला असता तिथंही अचानक पाऊस पडू लागला आणि जसा तो रेस्टॉरंटमधून बाहेर आला, तसा पाऊस थांबला. नंतर त्याला पुन्हा जेलमध्ये आणण्यात आलं. तिथंही अशीच घटना घडली. आश्चर्य म्हणजे या पावसात फक्त ती व्यक्ती भिजायची. त्यामुळे सर्वजण घाबरले. अखेर तिथं पादरीला बोलावण्यात आलं. पादरीने बायबल वाचायला सुरुवात करतात संपूर्ण खोली पावसाने भिजली. पण बायबल मात्र कोरडं होतं. या दिवशी पाऊस आपोआप थांबला आणि डॉन डेकरच्या आयुष्यातील ही अनोखी शक्तीही गेली.
advertisement
अद्याप उलगडलं नाही रहस्य
view commentsपेन्सिलव्हेनियामधील 1983 सालातील ही विचित्र घटना आहे. ज्याचं रहस्य अद्यापही उलगडलेलं नाही. या विचित्र शक्तीबाबत या व्यक्तीलाही काही माहिती नव्हतं. काही जणांनी या घटनेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. तर काहींनी याला पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी म्हटलं आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
Location :
Delhi
First Published :
May 29, 2025 8:09 AM IST


