Do You Know : असं फळ जे निळं दिसतं, पण त्याचा रंग निळा नाही, 99 टक्के लोकांना माहितच नसणार नाव

Last Updated:

तुम्हाला अशा फळाचं नाव सांगता येईल का? तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे....

निळं फळ
निळं फळ
मुंबई : तुम्ही अनेक फळं खाल्ली असतील आणि प्रत्येक फळाला त्याचा स्वतःचा रंग असतो. हा रंग फळात असलेल्या पिगमेंटमुळे (रंगद्रव्य) येतो. जर फळात हिरवे पिगमेंट जास्त असेल तर ते हिरवे दिसेल आणि पिवळे पिगमेंट जास्त असेल तर पिवळे दिसेल. पण कल्पना करा, तुम्हाला असं एक फळ मिळालं जे दिसायला चमकदार निळं आहे, पण त्यात निळ्या रंगाचा एकही कण नाही तर.....?
तुम्हाला अशा फळाचं नाव सांगता येईल का? तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे....
मीडिया अहवालानुसार, शास्त्रज्ञांनी नुकतंच ऑस्ट्रेलिया, पापुआ न्यू गिनी आणि इंडोनेशियाच्या घनदाट वर्षावनांमध्ये आढळणाऱ्या एका झाडावर संशोधन केले आहे. या झाडाचे नाव ब्ल्यू क्वांडोंग (Blue Quandong) आहे, ज्याला काही ठिकाणी ब्ल्यू मार्बल ट्री (Blue Marble Tree) असेही म्हणतात. या झाडाचे फळ पाहिल्यास, पहिल्या दृष्टीक्षेपात ते एखाद्या धातूवर निळा रंग चढवल्यासारखे वाटते, ते अस्सल फळ वाटतच नाही.
advertisement
पण हाच या संशोधनाचा सर्वात रोमांचक भाग आहे. जगात हे एक असे फळ आहे, जे निळे असूनही त्याच्या आत निळा रंग नाही. शास्त्रज्ञांसाठी हे एक कोडे होते, जे सोडवायला त्यांना महिने लागले.
निसर्गाची सर्वात मोठी 'ऑप्टिकल ट्रिक'
संशोधनातून हे समोर आले आहे की, ब्ल्यू क्वांडोंग फळाचा रंग पिगमेंटमुळे नव्हे, तर संरचनात्मक रंग (Structural Colour) यामुळे निळा दिसतो. हे तुम्ही असे समजू शकता, जसे की मोराची मान निळी चमकते, फुलपाखराचे पंख लुकलुकतात आणि भुंग्यावर धातूसारखा रंग दिसतो.
advertisement
संशोधकांच्या मते, या फळाच्या त्वचेत नॅनो-स्तरावर अत्यंत सूक्ष्म सेल्युलोजचे थर असतात. हे थर प्रकाशाला अशा प्रकारे वळवतात की फक्त निळ्या तरंगलांबी (Blue Wavelengths) परत येतात आणि बाकीचे सर्व रंग गायब होतात. जेव्हा शास्त्रज्ञांनी त्यातील पिगमेंट काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना मिळालेला पदार्थ राखाडी (Grey) रंगाचा होता. यातून हे सिद्ध झाले की, फळ निळे दिसत असले तरी, त्यात निळा रंग नसतो.
advertisement
वनस्पति इतिहासात पहिल्यांदा दिसलं असं दृश्य
वनस्पति विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या फळामध्ये इतकी गहन निळी चमक पाहिली गेली आहे. जगात आजपर्यंत स्ट्रक्चरल ब्लू (Structural Blue) चे असे काहीच उदाहरणे मिळाली आहेत. फळांमध्ये तर अशा प्रकारची गोष्ट जवळजवळ ऐकण्यात नव्हती.
पक्ष्यांसाठी निसर्गाचा निळा संकेत?
शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की, या फळातला गहन निळा रंग पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी विकसित झाला असावा. कारण हे फळ घनदाट जंगलात वाढणाऱ्या झाडावर लागते, जिथे सूर्यप्रकाश कमी पोहोचतो. अशा वातावरणात, हे चमकदार निळे फळ अतिनील (UV) आणि निळ्या प्रकाशात दूरूनच चमकते.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Do You Know : असं फळ जे निळं दिसतं, पण त्याचा रंग निळा नाही, 99 टक्के लोकांना माहितच नसणार नाव
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement