कोण आहे दुबईची राजकुमारी? जिने इंस्टाग्रामवर दिला पहिल्या नवऱ्याला 'तलाक'; आता साखरपुड्याचे फोटो Viral
- Published by:Devika Shinde
Last Updated:
दोघांनी जून महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या स्प्रिंग/समर 2025 फॅशन शो दरम्यान साखरपुडा केला. त्यावेळी मोंटाना प्रसिद्ध पॅराडिस या ब्रँडसाठी रॅम्पवर वॉक करत होते.
मुंबई : आजकाल सोशल मीडियावर शाही घराण्यांच्या गोष्टींना नेहमीच लोकांचा विशेष प्रतिसाद मिळतो. लोकांना नेहमीच त्यांच्याकडे काय सुरु आहे? ते कसं आयुष्य जगतात हे जाणून घेण्यात उत्सुकता असते. राजघराण्यातील लग्नसोहळे, साखरपुडे किंवा वैवाहिक जीवनातील चढउतार हे विषय देखील लोकांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अशाच एका शाही प्रेमकथेनं सध्या जगभरातील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
दुबईच्या शाही घराण्यातील राजकुमारी शेखा माहरा बिन मोहम्मद राशिद अल मकतूम यांनी सुप्रसिद्ध मोरोक्को-अमेरिकन रॅपर फ्रेंच मोंटाना (वय 41) यांच्याशी साखरपुडा केला आहे. ही घोषणा मोंटाना यांनी अधिकृतरीत्या केली आहे आणि त्यांच्या प्रतिनिधीने देखील या नात्याची पुष्टी केली आहे.
फॅशन वीकदरम्यान झाले प्रपोजल
दोघांनी जून महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या स्प्रिंग/समर 2025 फॅशन शो दरम्यान साखरपुडा केला. त्यावेळी मोंटाना प्रसिद्ध पॅराडिस या ब्रँडसाठी रॅम्पवर वॉक करत होते.
advertisement
कोण आहेत प्रिन्सेस माहरा?
31 वर्षीय माहरा यांचा जन्म मूळतः क्रिस्टीना या नावाने झाला होता. नंतर संयुक्त अरब अमीरातमध्ये येऊन त्यांनी अरबी नाव स्वीकारले. त्या शाही अल मकतूम कुटुंबातील सर्वाधिक चर्चित सदस्यांपैकी एक आहेत. माहरा या फॅशन आणि घोडेस्वारीत विशेष रस घेतात तसेच सोशल मीडियावरही सक्रिय असतात.
पूर्वीचं वैवाहिक जीवन आणि घटस्फोट
माहरा यांनी एप्रिल 2023 मध्ये अमिराती व्यावसायिक शेख माना बिन मोहम्मद बिन राशिद बिन माना अल मकतूम यांच्याशी विवाह केला होता. मे 2024 मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला. पण फक्त दोन महिन्यांत म्हणजे जुलै 2024 मध्ये माहरा यांनी सोशल मीडियावरच इस्लामी तीन तलाक पद्धतीचा उल्लेख करत नवऱ्याला तलाक दिला. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं, “मी तुम्हाला तलाक देते... स्वतःची काळजी घ्या.” आश्चर्य म्हणजे तिचा तला इंस्टाग्रामवर झाला, पण आता ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे.
advertisement

दुबईची राजकुमारी

दुबईची राजकुमारी
उद्योजिका म्हणून नवा प्रवास
लंडनमध्ये इंटरनॅशनल रिलेशनमध्ये पदवी घेतल्यानंतर, माहरा यांनी स्वतःची फ्रॅग्रन्स लाइन Mahra M1 लाँच केली. विशेष म्हणजे त्यांच्या फ्रॅग्रन्सचा एक प्रकार त्यांनी मुद्दाम “तलाक” या नावाने बाजारात आणला.
advertisement
फ्रेंच मोंटाना कोण?
फ्रेंच मोंटाना हे मोरोक्को-अमेरिकन रॅपर आहे आणि त्यांच्या Unforgettable आणि No Stylist या हिट गाण्यांसाठी ते ओळखले जातात. ऑक्टोबर 2024 पासून त्यांचं नाव माहरा यांच्यासोबत जोडले जात आहे.
दोघांना पॅरिस, दुबई आणि मोरोक्कोमध्ये अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. पॅरिस फॅशन वीकदरम्यान हातात हात घालून दिसल्यानंतर त्यांच्या नात्याच्या चर्चेला अधिक उधाण आलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2025 7:14 PM IST
मराठी बातम्या/Viral/
कोण आहे दुबईची राजकुमारी? जिने इंस्टाग्रामवर दिला पहिल्या नवऱ्याला 'तलाक'; आता साखरपुड्याचे फोटो Viral


