General Knowledge : भारतातील ‘तरंगतं गाव’; जिथे घरं, बाजार आणि शाळाही पाण्यावर तरंगतात, कुठे आणि कसं जायचं इथे?

Last Updated:

वारा आणि पाण्याच्या प्रवाहानुसार या घरांची जागा देखील बदलत राहते. म्हणूनच इथं उभं राहिलं तरी जमिनीखाली थोडी हालचाल जाणवते जणू काही धरतीच डोलते आहे.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : तुम्ही जर फिरायला, नवीन ठिकाणं पाहायला आणि थोडं साहसी (adventurous) काही अनुभवायला आवडतं असाल, तर भारतातलं हे एक ठिकाण नक्कीच तुमच्या “ट्रॅव्हल बकेटलिस्ट” मध्ये असलं पाहिजे. हे ठिकाण आहे तरंगतं गाव, म्हणजेच फ्लोटिंग व्हिलेज. इथं तुम्हाला असं काही पाहायला मिळेल, जे जगातल्या फार थोड्या ठिकाणी पाहायला मिळतं कारण इथं घरं, शाळा, बाजार, अगदी लोकांचं रोजचं जीवन सगळंच पाण्यावर तरंगतं.
हो, ऐकून थोडं अविश्वसनीय वाटेल पण या गावातलं प्रत्येक घर पाण्यावर तरंगत असतं. वारा आणि पाण्याच्या प्रवाहानुसार या घरांची जागा देखील बदलत राहते. म्हणूनच इथं उभं राहिलं तरी जमिनीखाली थोडी हालचाल जाणवते जणू काही धरतीच डोलते आहे.
हे ‘तरंगतं गाव’ आहे तरी कुठं?
हे अद्भुत गाव मणिपूर राज्यातील लोकटक सरोवरावर वसलेलं आहे, आणि याचं नाव आहे ‘चंपू खंगपोक’ (Champu Khangpok).
advertisement
लोकटक सरोवर हे उत्तर-पूर्व भारतातील सर्वात मोठं गोडं पाण्याचं सरोवर आहे. या सरोवरावर तयार झालेल्या तरंगत्या बेटांना “फुमडी (Phumdis)” म्हणतात. या फुमडीवरच अनेक कुटुंबं राहत असून त्यांचं संपूर्ण आयुष्य पाण्यावरचं आहे. जणू हे सरोवरच त्यांचं जग आहे.
लोकांचं जीवन आणि जगणं
या गावातले लोक पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. बहुतेकजण मच्छीमार आहेत. त्यांची घरं बांबूपासून बनवलेली असतात आणि ती पाण्यावर सहज तरंगतात. वीजेसाठी ते सोलर पॅनेल्स वापरतात, तर ये-जा करण्यासाठी नाव हे मुख्य साधन असतं. पिण्याचं पाणी लोकटक सरोवरातूनच घेतलं जातं पण ते फिटकरी आणि नैसर्गिक पदार्थांनी शुद्ध केलं जातं. येथील प्रत्येक घरात बायो-डायजेस्टर टॉयलेट्स वापरले जातात, जे पर्यावरणपूरक आहेत.
advertisement
हे गाव तरंगतं कसं राहतं?
या फ्लोटिंग व्हिलेजमध्ये सुमारे 500 घरं आणि 2000 लोक राहतात. हे गाव रामसर कन्व्हेन्शनने आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या “आर्द्रभूमी” म्हणून घोषित केलं आहे. इथल्या फुमडी म्हणजे जलवनस्पती, गाळ आणि सेंद्रिय घटकांचं मिश्रण असतं. काळाच्या ओघात हे घटक एकत्र येऊन जाड गालिच्यासारखी तरंगणारी पातळ चटई तयार करतात दिसायला ती जमीनसारखी वाटते, पण ती पाण्यावर हलकी डोलत असते.
advertisement
इथं कसं पोहोचायचं?
या तैरत्या गावात जाण्यासाठी तुम्हाला प्रथम इम्फाळ (Imphal) शहरात पोहोचावं लागतं. इथून मोइरांग (Moirang) किंवा थांगा (Thanga) या गावांपर्यंत बस किंवा टॅक्सीने जाता येतं. तेथून नावेतून लोकटक सरोवर ओलांडून तुम्ही थेट ‘चंपू खंगपोक’ या तरंगत्या गावात पोहोचू शकता.
का आहे हे ठिकाण खास?
इथं गेल्यावर तुम्हाला जणू एखाद्या स्वप्नातील जगात आल्यासारखं वाटेल. पाण्यावर तरंगणारं घर, डोलणारा बाजार, नावेतून जाणारे शाळकरी मुलं सगळंच वेगळं आणि मोहक भारताच्या निसर्गरम्य ठिकाणांमध्ये हे फ्लोटिंग व्हिलेज एक असं ठिकाण आहे, जे तुम्हाला पृथ्वीवरील स्वर्गाचा अनुभव देतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
General Knowledge : भारतातील ‘तरंगतं गाव’; जिथे घरं, बाजार आणि शाळाही पाण्यावर तरंगतात, कुठे आणि कसं जायचं इथे?
Next Article
advertisement
BMC Election : स्वाभिमानावर आघात, हा अपमान मी कदापि सहन करणार नाही, रामदास आठवले संतापले
''स्वाभिमानावर आघात...हा अपमान मी कदापि सहन करणार नाही'', रामदास आठवले संतापले
  • भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जागा वाटपाची चर्चा झाली असली तरी महायुतीचे घटक पक्ष

  • रिपब्लिकन पार्टी आठवले गटामध्ये भाजप विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

  • केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपला संताप व्यक्त केला आ

View All
advertisement