Ganapati Decoration: आकर्षक लाइटिंगने उजळून निघेल बाप्पा, मुंबईत फक्त 40 रुपयांपासून पर्याय उपलब्ध

Last Updated:

Ganapati Decoration: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या आणि पूजा साहित्याच्या वस्तूंनी बाजार सजले आहेत. गणेशभक्त घरगुती बाप्पांसाठी मखर आणि सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.

+
Ganapati

Ganapati Decoration: आकर्षक लाइटिंगने उजळून निघेल बाप्पा, मुंबईत फक्त 40 रुपयांपासून पर्याय उपलब्ध

मुंबई: यावर्षी 27 ऑगस्ट रोजी सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सजावटीच्या आणि पूजा साहित्याच्या वस्तूंनी बाजार सजले आहेत. गणेशभक्त घरगुती बाप्पांसाठी मखर आणि सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. तुम्ही देखील बाप्पाच्या सजावटीसाठी स्वस्तात मस्त साहित्याच्या शोधात असाल तर क्रॉफर्ड मार्केटजवळील प्रसिद्ध लोहार चाळ हे ठिकाण तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतं.
लोहार चाळ हे रंगीबेरंगी आणि आकर्षक लाइटिंग खरेदीसाठी हॉटस्पॉट बनलं आहे. मंगलदास बिल्डिंग नंबर 5, तिसरा मजला, किचन गार्डन लेन या ठिकाणी गणपतीच्या डेकोरेशनसाठी आवश्यक असलेल्या लाइटिंगच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. येथे एलईडी लाइट्स, झुंबर, रंग बदलणाऱ्या लाईटच्या माळा, लाईटचे ओम आणि लाईटचे गणपती फेस इत्यादी साहित्य अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे.
advertisement
या ठिकाणी लाइटिंगची किंमत अवघ्या 40 रुपयांपासून सुरू होते. 10 ते 20 मीटर लांबीच्या एलईडी लाइट्स 40 ते 190 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. विविध रंग आणि पॅटर्नमध्ये डेकोरेटिव्ह झालर आणि कलर-चेंजिंग लाइट्स मिळतात. लाइटिंग समईची 95 ते 335 रुपयांपर्यंत मिळत आहे. याशिवाय येथे लहान झुंबर 60 रुपयांपासून तर मोठे झुंबर 200 ते 1400 पर्यंत मिळतात.
advertisement
बाप्पाच्या सजावटीसाठी आकर्षक 'गणपती फेस' लाइट 600 रुपयांमध्ये आणि 'ओम' लाइट 300 रुपयांमध्ये मिळत आहे. विघ्नहर्ता, मोरया, गणपती बाप्पा अशा अक्षरांची झगमगती लाइटिंग 600 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सात रंगांनी उजळणारी 'सेव्हन कलर लाइटिंग' 650 रुपयांना मिळत आहे. या ठिकाणी लाइटिंगचे 30 ते 40 प्रकार उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Ganapati Decoration: आकर्षक लाइटिंगने उजळून निघेल बाप्पा, मुंबईत फक्त 40 रुपयांपासून पर्याय उपलब्ध
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement