advertisement

'जुगाड' तर हिंदी शब्द; मग याला मराठीत काय म्हणतात? बहुतेकांना माहिती नाही उत्तर

Last Updated:

Jugaad In Marathi : महाराष्ट्रात बहुतांश लोक मराठी भाषाच बोलतात

'जुगाड'ला मराठीत काय म्हणतात?
'जुगाड'ला मराठीत काय म्हणतात?
मुंबई: आपल्या राज्यात मराठी भाषा जरी बोलली जात असली तरी अनेक शब्द असे असतात जे आपण इंग्रजी किंवा हिंदीमधील वापरतो. या शब्दांची आपल्याला अगदी इतकी सवय झालेली असते, की तो मराठीतील शब्द नाही, हेदेखील अनेकदा आपण विसरून जातो. काही शब्द असे आहेत, जे अगदी वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळेच सर्रास हिंदी किंवा इंग्रजीमधील वापरतात.
अशाच शब्दांसाठीचे मराठी शब्द सांगणारी सीरिज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. यात आपण आजवर क्रिकेट, सिमेंट, पोलीस, टीव्ही, मोबाईल, इंटरनेट, डाऊनलोड, बँक, इंजेक्शन, स्क्रीनशॉट, सेल्फी अशा अनेक दररोज वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ जाणून घेतले आहेत. आजही आम्ही तुमच्यासाठी असाच एक शब्द आणला आहे. मात्र तो इंग्रजी नसून हिंदी आहे.
advertisement
हा शब्द आहे जुगाड. हा शब्द तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकला किंवा वाचलाही असेल. कोणत्याही निरूपयोगी गोष्टीपासून काहीतरी शक्कल लढवून बनवलेली नवी उपयोगाची वस्तू असो किंवा कोणतंही काम सुरू राहण्यासाठी केलेली वस्तूंसोबतची तडजोड असो, अशा अनेक गोष्टींसाठी आपण जुगाड हा शब्द वापरतो. मात्र, याला मराठीत काय म्हणायचं हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
अनेकांना यासाठीचा मराठी शब्द सांगता येणार नाही. जुगाडला मराठीमध्ये तजवीज, सोय, बंदोबस्त, युक्ती, क्लृप्ती , उपाय, तोडगा, तात्पुरती - कामचलाऊ व्यवस्था असे अनेक शब्द आपण वापरू शकतो. तुम्हालाही असे काही शब्द माहिती असतील, तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Viral/
'जुगाड' तर हिंदी शब्द; मग याला मराठीत काय म्हणतात? बहुतेकांना माहिती नाही उत्तर
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement