मुलीच्या दातांचा X-ray काढायला गेली आई, रिपोर्टमुळे समोर आलं, 6 महिन्यांपूर्वी लपवलेलं सत्य

Last Updated:

एक आई आपल्या 13 वर्षांच्या मुलीला ‘ब्रेसेस’ लावण्यासाठी डेंटिस्टकडे घेऊन गेली होती. अगदी सामान्य अशी भेट होती, पण त्यावेळी दातांच्या काढलेल्या एक्स-रे रिपोर्टने सगळंच बदलून टाकलं.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजकाल मुलं-मुली फॅशनच्या नादात वेगवेगळ्या गोष्टी करायला मागेपुढे पाहात नाहीत. आई-वडिलांनी मनाई केली तरी गुपचूप हट्ट पूर्ण करायचा हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. कधी हा हट्ट निरुपद्रवी ठरतो, तर कधी तो धोकादायकही ठरू शकतो. अशीच एक धक्कादायक सोशल मीडियावर समोर आली आहे, जिथे एका लहान मुलीच्या शरारात एक्स-रे रिपोर्टमुळे अशी गोष्ट आढळली की पालकांसह डॉक्टरांनाही धक्का बसला.
एक आई आपल्या 13 वर्षांच्या मुलीला ‘ब्रेसेस’ लावण्यासाठी डेंटिस्टकडे घेऊन गेली होती. अगदी सामान्य अशी भेट होती, पण त्यावेळी दातांच्या काढलेल्या एक्स-रे रिपोर्टने सगळंच बदलून टाकलं. डॉक्टरांनी स्क्रीनवर जे दाखवलं ते पाहून आईच्या पायाखालची जमीन सरकली तर डॉक्टरांनाही क्षणभर काहीच सुचेना. कारण त्या लहान मुलीच्या साइनसमध्ये एक धातूचा छोटासा तुकडा अडकलेला दिसत होता.
advertisement
आईला समजत नव्हतं हा तुकडा आत गेला तरी कसं? पण मुलीच्या मात्र लगेचच लक्षात आलं की हा प्रकार कधी आणि कसा घडला
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. त्या मुलीने आईकडे नाक टोचण्यासाठी हट्ट धरला होता. तिच्या मैत्रिणीने नुकतीच नाकात पियर्सिंग केली होती आणि ते पाहून तिलाही हे करण्याची इच्छा होती पण आईने स्पष्ट सांगितलं होतं – “१६ वर्षांनंतर बघू, आत्ता हे सगळं करायचं नाही.”
advertisement
पण तिच्या आईने तिला कान टोचण्याची परवानगी दिली होती. ही परवानगी मिळाल्याने मुलगी थोडी शांत झाली होती. मात्र तिच्या मनात नाक टोचण्याचा विचार सतत घोळत होता. अखेर तिने एके दिवशी आईच्या नकळत धोकादायक प्रयोग केला. कान टोचताना वापरलेलं ईयररिंग तिने घेतलं आणि त्याने नाक टोचण्याचा प्रयत्न केला.
बाहेरून ते टोचण्याचा प्रयत्न केल्यावर ते नीट झालं नाही म्हणून मग तिने नाकाच्या आतल्या बाजूने टोचण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी अचानक शिंक आली आणि तो ईयररिंग श्वासाबरोबर जाऊन ते थेट साइनसमध्ये अडकलं.
advertisement
त्या क्षणी मुलीला काही वेदना झाल्या नाहीत, ना श्वास घेताना त्रास झाला. तिला वाटलं की कदाचित तो तुकडा खाली पडला असेल. म्हणून तिने आईकडे काही सांगितलंच नाही. दिवस गेले तसे ती गोष्ट तिच्या डोक्यातूनही निघून गेली. पण नशिबाने दातांसाठी केलेल्या एक्स-रेमुळे हे गुपित बाहेर आलं.
रिपोर्ट पाहिल्यानंतर आईने तातडीने ईएनटी स्पेशॅलिस्टकडे धाव घेतली. त्याच डॉक्टरांनी पूर्वी मुलीचे टॉन्सिल्स काढले होते. यावेळीही त्यांनीच जबाबदारी घेतली. लांब मेडिकल ट्विझरच्या मदतीने हळूहळू तो धातूचा तुकडा त्यांनी बाहेर काढला. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी वेदनारहित होती आणि मुलगीही सुखरूप राहिली.
advertisement
जेव्हा ही कहाणी रेडिटवर शेअर झाली तेव्हा ती क्षणात व्हायरल झाली. तब्बल 73 हजारांहून अधिक अपव्होट्स मिळाले. वाचकांनाही विश्वास बसत नव्हता की मुलीच्या अशा हट्टामुळे एवढा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. बरं झालं की एक्स-रेच्या निमित्ताने वेळेत सगळं उघडकीस आलं आणि धोकादायक परिस्थिती टळली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
मुलीच्या दातांचा X-ray काढायला गेली आई, रिपोर्टमुळे समोर आलं, 6 महिन्यांपूर्वी लपवलेलं सत्य
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement