कोणी विचारही केला नसेल असा व्यवसाय केला, तरुणाची कमाई ऐकली तर थक्क व्हाल; महिन्याकाठी लाखोंचा टर्नओव्हर
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नाशिकचे प्रफुल वाघ यांनी त्यांचे वडिल करत असलेले व्यवसाय करण्याचे ठरवले. ते वडिलांना व्यवसायातच मदत करायचे. आज प्रफुल यांचे स्वतःचे नाशिकमध्ये 3 पान शॉप असून त्यांच्याकडे 300 पेक्षा अधिक पानाचे प्रकार ते विक्री करत असतात. त्यांच्या या पानाच्या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला लाखोंची कमाई होते.
लहानपणापासून वडिलांना पान विक्रीचा व्यवसाय करत असलेले नाशिकचे प्रफुल वाघ यांनी देखील त्यांचा पिढीजात व्यवसाय करण्याचे ठरवले आणि वडिलांना त्यांच्या व्यवसायातच मदत करू लागले. आज प्रफुल यांचे स्वतःचे नाशिकमध्ये 3 पान शॉप असून त्यांच्याकडे 300 पेक्षा अधिक पानाचे प्रकार ते विक्री करत असतात. त्यांच्या या पानाच्या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला लाखोंची कमाई होते.
प्रफुल हे एक उच्च शिक्षित असून शिक्षण पूर्ण करून त्यांना व्यवसायच सांभाळायचा होता. ते गेल्या 10 वर्षांपासून त्यांचा 'दिनेश पान दरबार' नावाचा पान शॉप चालवत आहेत. सुरवातीला वडिलांची एक छोटे पान दुकान होते परंतु जेव्हापासून दिनेश यांनी त्यांचे हे दुकान सांभाळण्यास सुरवात केली, तेव्हा पासून ते आतापर्यंत नाशिकमध्ये दिनेश पान शॉपचे 3 दुकानं त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर उभारले आहेत. प्रफुल यांच्या या दुकानात तब्बल 300 पेक्षा अधिक पानाचे प्रकार मिळत असतात जे लहान मुलांन पासून ते वरिष्ठ एकदम आनंदाने खात असतात.
advertisement
विशेषत: प्रफुल कोणतेही अंमली पदार्थ या पानामध्ये टाकून देत नाहीत. त्याच बरोबर आपण मराठी उद्योजक वाढवण्यास आणि युवा पिढीला रोजगार देण्यास काही मदत करावी या करता दिनेश पान शॉपची फ्रँचाईसी सुद्धा आता ते देत आहेत. प्रफुल आता नाशिक मध्ये त्यांच्या पानांच्या चवीमुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. यांच्याकडचा देवीचा विळा हा आता सर्वत्रच प्रसिद्ध होत आहे. नाशिकच नाही तर आजूबाजूच्या शहरांमधून या पानासाठी त्यांच्याकडे मागणी केली जात आहे. त्यांचे पान शॉप नाशिक मध्ये द्वारका चौक या ठिकाणी आहे तर २ रे दुकान सागर सम्राट स्वीट पाटीदार भाव आणि तिसरे दुकान भंडारदरा या ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्हला देखील यांच्या या पानाची चव नक्कीच एकदा चाखायला हवी. त्याच बरोबर यांचे इन्स्टा dineshpaandarbar या नावाने आहे नक्की भेट द्या.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 21, 2025 5:59 PM IST
मराठी बातम्या/Viral/
कोणी विचारही केला नसेल असा व्यवसाय केला, तरुणाची कमाई ऐकली तर थक्क व्हाल; महिन्याकाठी लाखोंचा टर्नओव्हर