advertisement

प्रवासात हॉटेल रूम बुक करताय? मग 'या' 5 वस्तूंना हात लावण्याआधी दोनदा विचार करा

Last Updated:

एका हॉटेल स्टाफने खोलीतील 5 गोष्टींना थेट हात लावण्यासाठी मनाई केली आहे. त्या वस्तू कोणत्या आणि त्या मागची कारणं काय? चला जाणून घेऊ.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : प्रवास करताना बहुतांश लोकांसाठी हॉटेल म्हणजेच दुसरं घर असतं. प्रवासाच्या थकव्यानंतर हॉटेलच्या खोलीत चेक-इन करताना मिळणारा आराम हा शब्दांत सांगता येत नाही. नीटनेटकी खोली, आवश्यक सुविधा आणि त्यात सर्वात आकर्षक वाटणारा पांढराशुभ्र, आरामदायी पलंग ज्यावर आडवे होताच लगेच झोप लागेल. पण काही गोष्टी माहित झाल्यानंतर तुम्हाला हॉटेल रूमबद्दलचा हा विश्वास आणि कंफर्ट कमी झाल्याचं वाटू शकतं. कारण दिसायला स्वच्छ वाटणाऱ्या काही वस्तूंमध्ये खरोखरच स्वच्छतेचा अभाव असतो.
एका हॉटेल स्टाफने खोलीतील 5 गोष्टींना थेट हात लावण्यासाठी मनाई केली आहे. त्या वस्तू कोणत्या आणि त्या मागची कारणं काय? चला जाणून घेऊ.
1) पिण्याचे काचेचे ग्लास
हॉटेलमध्ये ठेवलेले ग्लास स्वच्छ दिसतात, पण अनेकदा ते नीट सॅनिटाईज केलेले नसतात. काहीवेळा हेच ग्लास टॉयलेट किंवा सिंक साफ करणाऱ्या स्पंजने पुसले जातात, असे रिपोर्ट्स सांगतात. त्यामुळे हॉटेलमधील ग्लास वापरण्यापूर्वी तो स्वतः धुऊन घेणं सुरक्षित ठरतं.
advertisement
2) बेडवरील सजावटीचा कपडा (बेडस्प्रेड)
बेडवर ठेवलेलं रंगीत डेकोरेटिव्ह थ्रो किंवा बेडस्प्रेड दिसायला सुंदर वाटतं. पण हॉटेल स्टाफच्या मते हे कपडे वर्षातून फक्त एक-दोन वेळाच धुतले जातात. प्रत्येक पाहुणा त्यावर बसतो किंवा झोपतो, पण ते वारंवार धुतले जात नाहीत. त्यामुळे रूममध्ये गेल्यावर ते बाजूला करणं उत्तम.
3) कॉफी मेकर
आश्चर्यकारक वाटेल, पण काही लोक हॉटेलच्या कॉफी मेकरमध्ये आपले कपडे किंवा अंडरगारमेंट्स धुण्याचाही 'जुगाड' करतात. त्यामुळे त्यात जीवाणू आणि घाण शिल्लक राहते. त्यामुळे कॉफी मेकर वापरण्यापूर्वी त्यात पाणी उकळून नीट साफ करावं, नाहीतर त्याचा वापर टाळावा.
advertisement
4) शॅम्पू आणि बॉडीवॉशच्या बाटल्या
हॉटेलमध्ये ठेवलेल्या टॉयलेटरीज अनेकदा री-यूजेबल पॅकेजिंगमध्ये असतात. काही लोक त्यात हेअर डाई, ब्लीचसारख्या इतर वस्तू मिसळतात. त्यामुळे शक्य असल्यास आपला शॅम्पू-बॉडीवॉश सोबत घेऊन जाणं किंवा हॉटेलकडून नवीन सीलबंद बाटल्या मागणं योग्य ठरतं.
5) टीव्हीचा रिमोट
हॉटेल रूममधील सर्वाधिक वापरली जाणारी वस्तू म्हणजे टीव्ही रिमोट. मात्र ही वस्तू फार क्वचित स्वच्छ केली जाते. प्रत्येक पाहुणा ते हाताळतो, त्यामुळे त्यावर जंतूंची शक्यता जास्त असते. त्यामुळे रिमोट वापरण्यापूर्वी सॅनिटायझर किंवा वाइप्सने स्वच्छ करणं आवश्यक आहे.
advertisement
पुढच्या वेळी प्रवास करताना हॉटेलमध्ये थांबताना या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली, तर आपण आजार किंवा इन्फेक्शनपासून दूर राहू शकतो.
view comments
मराठी बातम्या/Viral/
प्रवासात हॉटेल रूम बुक करताय? मग 'या' 5 वस्तूंना हात लावण्याआधी दोनदा विचार करा
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement