चीनमध्ये MBBS साठी किती खर्च येतो? भारताच्या तुलनेत किती स्वस्त किती महाग?

Last Updated:

भारतात MBBS ची फी एवढी जास्त आहे की मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे स्वप्न पूर्ण करणं कठीण होतं.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : डॉक्टर होण्याचं स्वप्न अनेक मुलांचं लहानपणापासून असतं. लहान मुलाला विचारलं की मोठं झाल्यावर काय बनणार तर त्यामध्ये 40 ते 50 टक्के मुलं तर डॉक्टरच सांगत असतील. हे अनंकांचं स्वप्न असतं पण कधीकधी परिस्थीती आणि लागणारी फी हे सगळं पाहाता अनेकांसाठी हे स्वप्न स्वप्नच रहातं. भारतात MBBS ची फी एवढी जास्त आहे की मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी हे स्वप्न पूर्ण करणं कठीण होतं. अशा विद्यार्थ्यांसाठी चीन एक उत्तम आणि किफायतशीर पर्याय म्हणून समोर आलं आहे.
भारतामध्ये MBBS पूर्ण करण्यासाठी साधारण 60 ते 90 लाख रुपये खर्च येतो, तर चीनमध्ये याच कोर्ससाठी केवळ 30 ते 50 लाख रुपये पुरेसे असतात. या खर्चामध्ये ट्यूशन फी, हॉस्टेल, जेवण आणि इतर आवश्यक खर्चही समाविष्ट असतात. त्यामुळे परदेशातून MBBS डिग्री घेऊन डॉक्टर बनण्याचं स्वप्न आता अधिक सोपं आणि परवडणारे झालं आहे.
advertisement
अनेक युनिव्हर्सिटीज इंटरनॅशनल विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमात शिक्षण देतात, त्यामुळे चीनी भाषा न येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिकणं सोपं जातं.
चीनमधील राहणीमान भारतापेक्षा स्वस्त आहे. जेवण, प्रवास आणि मेडिकल खर्चही कमी येतो.
MBBS कोर्सचा कालावधी सहा वर्षांचा असतो. पाच वर्षं क्लासरूम शिक्षण आणि एक वर्ष इंटर्नशिप.
विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपचीही सोय आहे, ज्यामुळे खर्च आणखी कमी होतो.
advertisement
पात्रता आणि प्रवेशासाठी आवश्यक गोष्टी
वय किमान 17 वर्षं असणं आवश्यक
12वीत फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये किमान 50% गुण
NEET परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक
मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक
चीनमध्ये MBBS शिक्षणासाठी वाढती लोकप्रियता याचं मुख्य कारण म्हणजे किफायतशीर खर्च, दर्जेदार शिक्षण आणि इंग्रजी माध्यमातील सोयी. त्यामुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
view comments
मराठी बातम्या/Viral/
चीनमध्ये MBBS साठी किती खर्च येतो? भारताच्या तुलनेत किती स्वस्त किती महाग?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement