advertisement

काल रात्रीपेक्षाही भयानक! अंतराळातून दिसलं महाकाय वादळाचं भयंकर रूप; पाहा VIDEO

Last Updated:

मिल्टन चक्रीवादळानं हाहाकार माजवला आहे. या महाकाय वादळाचं भयानक रूप अंतराळातूनही दिसलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

फोटो : सोशल मीडिया व्हायरल व्हिडीओ ग्रॅब
फोटो : सोशल मीडिया व्हायरल व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली : गुरुवारी रात्री अचानक आलेलं वारं पाहूनच सगळ्यांनाच धडकी भरली. पण अमेरिकेत तर महाकाय वादळ थैमान घालत आहे. यूएसमध्ये मिल्टन चक्रीवादळानं हाहाकार माजवला आहे. या महाकाय वादळाचं भयानक रूप अंतराळातूनही दिसलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मेक्सिकोच्या आखातात निर्माण झालेलं हरिकेन मिल्टन वेगाने फ्लोरिडाच्या दिशेने सरकलं.  मिळालेल्या माहितीनुसार, हे वादळ रविवारी टँपापासून सुमारे 780 मैल (1,255 किलोमीटर) दूर नैर्ऋत्य दिशेला होतं. वाऱ्यांचा जास्तीत जास्त वेग ताशी 85 मैल (140 किलोमीटर) होता. मिल्टन वादळ ताशी 7 मैल (11 किलोमीटर) वेगाने पूर्वेकडे फ्लोरिडाच्या दिशेने सरकत होतं. अखेर या वादळाने फ्लोरिडामध्ये थैमान घातलं.
advertisement
फ्लोरिडामध्ये कित्येक घरं कोसळली,  मुसळधार पावसामुळे, विजांचा कडकडाट झाला. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. जो नकाशा दिसतो आहे तो फ्लोरिडाचा आहे. त्या संपूर्ण भागात मिल्टन वादळ पसरलं आहे. वरून विजा चमकतानाही दिसत आहे. हे दृश्य पाहूनच आपल्याला धडकी भरते. अंगावर अक्षरश: काटा येतो.
advertisement
advertisement
मिल्टन हे गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेला धडकणारं दुसरं मोठं वादळ. काही दिवसांपूर्वी आलेल्या हेलन चक्रीवादळामुळे उत्तर कॅरोलिनामध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. हेलनने दक्षिण अमेरिकेत किमान 225 जणांचा बळी घेतला होता आणि 250 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं होतं.
advertisement
गेल्या काही काळापासून जगाच्या विविध भागांमध्ये सातत्याने वादळं येत आहेत. विशेष म्हणजे त्यांची तीव्रता प्रत्येक वेळी वाढत आहे. गेल्या 6 महिन्यांत अटलांटिक महासागरात 13 वादळं आली आहेत. त्यापैकी चार वादळं अमेरिकेला धडकली आहेत. त्यात हेलन आणि बेरील यांचा समावेश आहे. या वादळांमुळे अमेरिकेतल्या चौथ्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर असलेल्या ह्यूस्टनमधला वीजपुरवठा खंडित झाला होता.
advertisement
हरिकेन म्हणजे काय?
नासाच्या जागतिक पर्जन्यमापन अहवालानुसार, हरिकेन, टायफून आणि सायक्लोन हे वादळांचे तीन प्रकार आहेत. वादळांची निर्मिती कोणत्या प्रदेशात होते त्यानुसार त्यांचा प्रकार ठरतो. उत्तर अटलांटिक, मध्य आणि ईशान्य पॅसिफिक महासागरात विकसित होणाऱ्या वादळांना 'हरिकेन' म्हणतात. दक्षिण पॅसिफिक आणि हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या वादळांना 'सायक्लोन' म्हणतात. वायव्य पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या वादळांना 'टायफून' म्हणतात.
view comments
मराठी बातम्या/Viral/
काल रात्रीपेक्षाही भयानक! अंतराळातून दिसलं महाकाय वादळाचं भयंकर रूप; पाहा VIDEO
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement