तुम्हाला माहिती आहे का भारतातील झिरो नावाचं ठिकाण? खास आहे ही जागा

Last Updated:

एक झिरो नावाचं ठिकाण आहे. याचा नावापासूनच त्याबद्दलचं कुतूहल जागृत होतं. या प्रदेशातील संस्कृतीही भारताच्या इतर प्रदेशापेक्षा थोडी वेगळी आहे.

News18
News18
नवी दिल्ली : भारताच्या चारही दिशांना निसर्गसौंदर्यानं नटलेले प्रदेश आहेत. त्यातही ईशान्य भारतातील हिरव्यागार व संस्कृतिक वैविध्याने नटलेल्या प्रदेशाची पर्यटकांना अधिक भुरळ पडते. ईशान्य भारतात असलेल्या अरुणाचल प्रदेशात एक झिरो नावाचं ठिकाण आहे. याचा नावापासूनच त्याबद्दलचं कुतूहल जागृत होतं.
एक झिरो नावाचं ठिकाण आहे. याचा नावापासूनच त्याबद्दलचं कुतूहल जागृत होतं. या प्रदेशातील संस्कृतीही भारताच्या इतर प्रदेशापेक्षा थोडी वेगळी आहे.
मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश अशा भारताच्या उत्तर-पूर्वेकडे असलेल्या राज्यांचं निसर्गसौंदर्य काही वेगळंच आहे. या प्रदेशातील संस्कृतीही भारताच्या इतर प्रदेशापेक्षा थोडी वेगळी आहे. यातीलच अरुणाचल प्रदेश हे अतिशय सुंदर राज्य असून दरवर्षी तिथे अनेक पर्यटक भेट देतात. अरुणाचल प्रदेशमध्येच एक झिरो नावाचं ठिकाण आहे. ते एक हिल स्टेशन असून तिथे फिरायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
advertisement
सुंदर डोंगररांगांमध्ये वसलेल्या या ठिकाणी निसर्गरम्य दृश्य पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. हे ठिकाण छोटं असलं तरी तिथलं सौंदर्य लोकांना भुरळ पाडतं. समुद्रसपाटीपासून 5538 फूट ते आठ हजार फूट उंचावर हे ठिकाण आहे. देशभरातील अनेक पर्यटक झिरो या पर्यटनस्थळाला भेट देतात, मात्र अरुणाचल प्रदेशात फिरण्यासाठी तिथल्या सरकारकडून इनर लाइन परमिट घ्यावं लागतं. त्यासाठी ऑनलाइनही अर्ज करता येऊ शकतो.
advertisement
झिरो या ठिकाणी अनेक छोटी छोटी आदिवासी गावं आहेत. अनेकविध जातीजमातींची घरं त्या प्रदेशात वसलेली आहेत. त्यापैकी काही भटके असून ते सतत आपली घरं बदलत असतात. तिथे राहणाऱ्या लोकांची जीवनशैली, त्यांची भाषा, बोली, शारीरिक ठेवण, खाद्यसंस्कृती हे सगळंच इतरांपेक्षा वेगळं आहे.
advertisement
झिरो या पर्यटनस्थळी फिरायला जात असाल, तर झिरो-प्लूटो या शहराला नक्की भेट द्या. ते डोंगराळ भागात आहे. तिथून शहराचा सुंदर दृश्य दिसतं. तिथे येऊन लोक या ठिकाणाच्या प्रेमात पडतात. झिरो या ठिकाणी असलेलं सिद्धेश्वर नाथ मंदिरही पाहण्यासारखं आहे. पर्यटक आवर्जून या मंदिराला भेट देतात. या मंदिरात 25 फूट उंच आणि 22 फूट लांब असलेलं शिवलिंग आहे. त्यामुळे इथे भक्तांची रीघ लागलेली असते.
advertisement
झिरो हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं ठिकाण आहे. तिथं गेल्यावर तुम्हाला अगदी जवळून निसर्ग अनुभवता येतो. तिथली लोकसंख्याही अगदी कमी आहे. ते ठिकाण घनदाट जंगल, मोठमोठे पर्वत आणि हिरवीगार भातशेती अशा परिपूर्ण निसर्गानं वेढलेलं आहे. तिथले लोकही पर्यटकांचं मन जिंकून घेतात.
अरुणाचल प्रदेशातील झिरो या ठिकाणी जायचं असेल तर तेजपूर येथे विमानानं जावं लागतं. तिथून झिरोला पोहोचता येतं. आसाममधील नॉर्थ लखीमपूर विमानतळावरूनही पाच ते सहा तासांचा प्रवास करून या ठिकाणी जाता येऊ शकतं. निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर अरुणाचल प्रदेशमधील झिरो या ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी.
view comments
मराठी बातम्या/Viral/
तुम्हाला माहिती आहे का भारतातील झिरो नावाचं ठिकाण? खास आहे ही जागा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement