2 वर्षात 6 वेळा घरातून पळाले, 3 वेळा लग्न; लैला-मजनूच्या स्टोरीचा शेवटी घरच्यांनी निकाल लावलाच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ही गोष्ट आहे साधारण 2005 सालची. कमल खान त्यांच्या ऑफिसमध्ये बसले असताना त्यांची नजर सिमरन कौर यांच्यावर पडली. पहिल्याच भेटीत कमल सिमरनच्या प्रेमात पडले आणि त्यांना आपलेसे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मुंबई : प्रेम म्हणजे त्याग, संघर्ष आणि समर्पण! प्रेम कहाण्यांमध्ये 'लव्ह अँड वॉर' या दोन गोष्टींची चर्चा नेहमीच होते. जात, धर्म किंवा कुटुंबाचा विरोध असतानाही आपले प्रेम मिळवण्यासाठी कितपत संघर्ष करावा लागतो, याची कल्पना तुम्हाला आहे का? सहारनपूरमधील निगार खान (पूर्वीच्या सिमरन कौर) आणि कमाल खान यांची कहाणी अशीच आहे, जिथे आपल्या प्रेमासाठी त्यांना जवळजवळ दोन वर्षे घरच्यांपासून पळावं आणि लपावं लागलं, त्यांना खूप होल सोसावे लागले आणि कठिण प्रसंगातून त्यांनी आपली प्रेम कहानी अमर केली आहे.
ही गोष्ट आहे साधारण 2005 सालची. कमल खान त्यांच्या ऑफिसमध्ये बसले असताना त्यांची नजर सिमरन कौर यांच्यावर पडली. पहिल्याच भेटीत कमल सिमरनच्या प्रेमात पडले आणि त्यांना आपलेसे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कोणताही विचार न करता कमल यांनी त्या काळातही सिमरनला थेट लग्नाचा प्रस्ताव दिला.
सिमरनने आई-वडिलांशी बोलण्याचे वचन दिले. सिमरनच्या आईने या लग्नासाठी होकार दिला, पण कमल खानच्या घरच्यांनी मात्र दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न करण्यास कडाडून विरोध केला.
advertisement
जेव्हा कमल यांना वाटले की ते सिमरनला कायमचे गमावून बसतील, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघे घरातून पळून अलीगढला पोहोचले, पण काही दिवसांतच कुटुंबियांनी त्यांना शोधून घरी आणले.
कुटुंबाच्या समजावूनही दोघांनी फक्त एकमेकांशीच लग्न करण्याचा हट्ट कायम ठेवला. काही दिवसांनी त्यांनी पुन्हा योजना आखली आणि ते पंजाबमधील बटाला येथे पोहोचले. तिथेही घरच्यांना पत्ता लागला आणि ते थेट पोलीस घेऊन पोहोचले. कुटुंबीयांनी कमल खान यांना खूप मारहाण केली, पण कमल प्रेमाच्या निर्णयावर ठाम राहिले. यानंतर कमल यांनी कुटुंबाला पुन्हा एकदा चकमा दिला आणि सिमरनला घेऊन अमृतसरमार्गे दिल्ली गाठली.
advertisement
दिल्लीत दोघांनी काही काळ संघर्ष केला, पण पुन्हा एकदा कुटुंबीयांना त्यांचा ठावठिकाणा लागला. यावेळी कुटुंबीयांनी कमल खानला परत घरी आणले, पण सिमरन मात्र दिल्लीत एकटी पडली.
राहायला घर नाही, खायला अन्न नाही, इतकेच काय तर पायात चप्पलही नव्हती. सिमरनच्या घरच्यांनीही या परिस्थितीत तिला वाऱ्यावर सोडले होते. सिमरनने जवळच्या कचराकुंडीतून तुटलेली चप्पल उचलली आणि ती घातली. लोकांकडून उसने पैसे घेऊन ती डेहराडूनमधील एका नातेवाईकांकडे पोहोचली.
advertisement
इकडे कमल खान यांचा सिमरनशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यांनी कुठे आहे हे त्यांना माहीत नव्हते. दुसरीकडे, कुटुंबाने कमल यांना तब्बल एक महिनाभर साखळीने बांधून ठेवले होते. साखळी तुटताच कमल यांनी पुन्हा सिमरनचा शोध सुरू केला. सिमरन डेहराडूनमध्ये आहे हे समजताच कमल तिथे पोहोचले.
डेहराडूनमध्ये भेटल्यानंतर आता जास्त वाट न पाहता लग्न करायचे, असा निर्णय दोघांनी घेतला. त्यांनी पहिले आणि दुसरे कोर्ट मॅरेज केले, पण कुटुंबाने ते स्वीकारले नाही. अखेर त्यांनी अलाहाबाद (Allahabad) गाठले आणि तिथे तिसरे आणि अंतिम कोर्ट मॅरेज केले.
advertisement
तिसऱ्या कोर्ट मॅरेजचे कागदपत्रे पाहिल्यानंतर कुटुंबाला शेवटी त्यांचा हट्ट सोडावा लागला आणि त्यांचे लग्न स्वीकारावे लागले. सुमारे दीड ते दोन वर्षे हे दोघे कुटुंबापासून पळून होते आणि अनेक महिने एकमेकांपासून दूरही राहिले, पण त्यांनी आपले प्रेम कमी होऊ दिले नाही. सिमरन कौर आता निगार खान म्हणून ओळखल्या जातात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 7:11 PM IST
मराठी बातम्या/Viral/
2 वर्षात 6 वेळा घरातून पळाले, 3 वेळा लग्न; लैला-मजनूच्या स्टोरीचा शेवटी घरच्यांनी निकाल लावलाच


