Interesting Facts : विमानाच्या इंजिनवर कोंबड्या का फेकल्या जातात? उत्तर वाचून तुम्हीही हैराण व्हाल!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
विमानाच्या इंजिनवर कोंबड्या का फेकल्या जातात? हा प्रश्न गेली अनेक दशके गाजत आहे. याचे योग्य उत्तर तुम्हाला माहीत आहे का? या विधानामागील वास्तव काय आहे ते जाणून घेऊया.
मुंबई, 5 ऑक्टोबर : आपल्यापैकी अनेकांनी कधी ना कधी विमानाने प्रवास केला असेल. पण याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आणि जेव्हा माहिती समोर येते तेव्हा आपल्याला धक्का बसतो. असाच एक प्रश्न सध्या Quora या सोशल मीडिया साइटवर चर्चेचा विषय बनला आहे. एका वापरकर्त्याने विचारले की, विमानाच्या इंजिनवर कोंबडी का फेकली जाते? हा प्रश्न तुम्हीही अनेकदा ऐकला असेल. आज आम्ही तुम्हाला त्याचे वास्तव सांगणार आहोत, जे खूपच धक्कादायक आहे.
विमानाच्या इंजिनवर मेलेली कोंबडी फेकण्यामागे एक खास कारण आहे. हे केले जाते जेणेकरून विमानाच्या इंजिनची चाचणी घेता येईल. आपण बऱ्याच ऐकले असेल की, पक्षी विमानाच्या फ्लायिंग विंग्जवर आदळला. त्यामुळे अपघात होण्याची भीती असते. विमान कोसळल्यास हजारो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागू शकतो. हे टाळण्यासाठी इंजिनची चाचणी केली जाते. जेणेकरून लँडिंग किंवा टेकऑफ दरम्यान विमानावर पक्षी आदळल्यास त्याचे नुकसान होणार नाही.
advertisement
अनेक वेळा नकली पक्षी किंवा मेलेली कोंबडीदेखील फेकली जाते
विमान तज्ञांच्या मते, जेव्हा विमान हवेत जात असते किंवा लँडिंग करत असते तेव्हा कोणीतरी पक्षी येऊन धडकतो की काय अशी भीती नेहमीच असते. त्यामुळे विमानाचेही नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे विमान उत्पादक कंपन्या त्यावर कोंबड्या टाकून त्याची चाचणी घेतात. त्याला "बर्ड कॅनन" म्हणतात. कधीकधी हे बनावट पक्षी देखील असतात किंवा अगदी मेलेली कोंबडी. जेणेकरून पक्ष्यांच्या धडकेने विमानाचे इंजिन काम करणे बंद होणार नाही, याची खात्री करता येईल. या प्रक्रियेत 2 ते 4 किलो चिकन वापरले जाते.
advertisement
1950 मध्ये पहिल्यांदा करण्यात आला हा प्रयोग
अनेक दशकांपासून हा प्रयोग केला जात आहे. हे प्रथम 1950 च्या दशकात हर्टफोर्डशायरमधील डी हॅव्हिलँड एअरक्राफ्टमध्ये केले गेले. या प्रक्रियेत मेलेल्या कोंबड्यांचा वापर केला जातो आणि इंजिनला आग लागते की नाही हे पाहिले जाते. त्यावेळी या चाचणीत एका कोंबड्याला इंजिनमध्ये टाकण्यात आले होते. चाचणी यशस्वी झाली आणि कोंबडा कोणत्याही नुकसानाशिवाय इंजिनमधून बाहेर आला.
advertisement
या चाचणीनंतर विमानाच्या इंजिनची चाचणी घेण्यासाठी कोंबडीचा वापर केला जातो, असा समज पसरला. पण आजकाल हे फार क्वचितच घडते किंवा अजिबात होत नाही. कारण इंजिन चाचणीच्या अधिक आधुनिक पद्धती आता उदयास आल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 05, 2023 4:46 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Interesting Facts : विमानाच्या इंजिनवर कोंबड्या का फेकल्या जातात? उत्तर वाचून तुम्हीही हैराण व्हाल!







