बसमध्ये वयस्क पुरुषांनी पैसे द्यायचे अन् महिलांनी मोफत प्रवास करायचा, हे योग्य आहे का? पुरुष प्रवाशाचा रोखठोक प्रश्न
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
कर्नाटक सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवासाची योजना जाहीर केली आहे. मात्र, एका प्रवाशाने सोशल मीडियावर या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "हे योग्य आहे का?" असे विचारून या योजनेच्या आर्थिक परिणामांवर चर्चा झाली आहे. काहींनी याला महिला सशक्तीकरण तर काहींनी मतांसाठीची खेळी म्हटले आहे.
कर्नाटक राज्यातील महिलांसाठी 'मोफत बस प्रवास योजने'वरून समाज माध्यमांवर (Social Media) जोरदार चर्चा सुरू आहे. एका पुरुष प्रवाशाने या योजनेवर प्रश्नचिन्ह उभे करत एक पोस्ट टाकली, जी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
बेंगळुरूच्या प्रवाशाचा प्रश्न : बेंगळुरूच्या किरण कुमार नावाच्या व्यक्तीने कर्नाटक सरकारद्वारे महिलांना देण्यात येणाऱ्या मोफत बस प्रवासावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची पोस्ट 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे आणि 1500 हून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत.
किरण कुमार यांनी मांडलेले 6 महत्त्वाचे मुद्दे
- बसमध्ये 50 प्रवाशांपैकी 30 महिला होत्या, ज्या फक्त आधार कार्ड दाखवून मोफत प्रवास करत होत्या. हे योग्य आहे का? ही समानता आहे का?
- उर्वरित 20 लोक पूर्ण बसचे भाडे भरत आहेत, हे योग्य आहे का?एका बाजूला एक वृद्ध व्यक्ती तिकीट काढण्यासाठी खिशात पैसे शोधत होता, तर दुसरीकडे एक तरुण महिला व्हिडिओ कॉलवर बोलत मोफत प्रवास करत होती, हे योग्य आहे का?
- जर सरकारकडे इतका अतिरिक्त पैसा आहे, तर तो उर्वरित 20 लोकांसाठी बस सेवा मोफत का करत नाही? सर्वांसाठी मोफत बस सेवा का सुरू करत नाही?
- जगभरात, ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांना सवलती आणि कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. येथे बेंगळुरू आणि म्हैसूरसारख्या समृद्ध शहरांतील महिला मोफत प्रवास करत आहेत, कारण ती योजना उपलब्ध आहे. हे योग्य आहे का?
- हाच मोफत पैसा शहरांतील कचरा साफ करण्यासाठी, खड्डे बुजवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी का वापरला जाऊ शकत नाही?
- शेवटी, किरण कुमार यांनी लिहिले की, मतांसाठी मोफत भेटवस्तू (रेवड्या वाटणे) देण्याच्या दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत आणि यातून लवकर बाहेर पडणे कठीण आहे.
advertisement
राजकीय प्रतिक्रिया : कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. या निर्णयावर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. भाजप आमदार महेश टी. यांनी म्हटले आहे की, "काँग्रेस सरकारला दीड वर्षातच कळाले की, मोफत योजना चालवणे कठीण आहे, त्यामुळे एका बाजूला महिलांना मोफत प्रवास देत आहेत, तर दुसरीकडे भाड्यात 20 ते 30 टक्क्यांची वाढ करत आहेत."
advertisement
समर्थन आणि युक्तिवाद : काही लोकांनी असा युक्तिवाद केला आहे की, या योजनेद्वारे महिलांचे सक्षमीकरण होत आहे. त्याद्वारे महिला सहजपणे कामावर जाऊन पैसे कमवू शकतील.
I took an early morning bus to Mysuru, from Bengaluru. ₹210 fare. Comfortable KSRTC bus and a world class highway for fast travel.
But I got a few thoughts.
1) Nearly 30 of the 50 passengers were women. Just show Aadhar and travel free. Is this fair? Is it equality?
2) 20… pic.twitter.com/2TfkzF88IA
— Kiran Kumar S (@KiranKS) January 8, 2025
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 09, 2025 6:20 PM IST
मराठी बातम्या/Viral/
बसमध्ये वयस्क पुरुषांनी पैसे द्यायचे अन् महिलांनी मोफत प्रवास करायचा, हे योग्य आहे का? पुरुष प्रवाशाचा रोखठोक प्रश्न