चांद्रयान 3 ची आणखी एक कमाल! चंद्राचं असं रहस्य उलगडलं, शास्त्रज्ञही आश्चर्यचकीत

Last Updated:

चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सतत चमत्कार करत आहे. चांद्रयान-3 मधून मिळालेल्या माहितीवरून आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. 

News18
News18
नवी दिल्ली : चांद्रयान-3 ने जगभरात भारतीय अंतराळ संस्था इस्रोसह भारताला वैभव प्राप्त करून दिले आहे. आता यातून मिळालेल्या माहितीवरून नवा खुलासा झाला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राचा दक्षिण ध्रुव एकेकाळी द्रव वितळलेल्या खडकांच्या समुद्राने झाकलेला होता. याचा अर्थ चंद्राच्या आत आणि बाहेर लावा असायचा. त्याला मॅग्मा महासागर असेही म्हणतात. नुकत्याच नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधातून हा खुलासा झाला आहे.
हे संशोधन चंद्राच्या निर्मितीबद्दलच्या कल्पनेला समर्थन देतात.  ज्याला चंद्र मॅग्मा महासागर सिद्धांत म्हणतात. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा चंद्र 4.5 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाला तेव्हा तो थंड होऊ लागला आणि फेरोअन एनोर्थोसाइट नावाचे हलके खनिज पृष्ठभागावर तरंगू लागले. या फेरोअन एनोर्थोसाइट किंवा वितळलेल्या खडकाने चंद्राचा पृष्ठभाग तयार केला. नवीन शोधाच्या मागे असलेल्या टीमला दक्षिण ध्रुवावर फेरोन एनोर्थोसाइटचे पुरावे सापडले.
advertisement
शास्त्रज्ञ काय म्हणाले?
नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधाचे सह-लेखक अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेचे भूवैज्ञानिक संतोष व्ही. वडवले म्हणाले, "चंद्रावर लूनार मॅग्मा महासागर (एलएमओ) असल्याचे आमच्या उपकरणाने सिद्ध केले आहे. चंद्राच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीचा सिद्धांत आपल्या निरीक्षणांच्या प्रकाशात आणखी मजबूत होतो."
भारताच्या मोहिमेपूर्वी, अपोलो कार्यक्रमाचा भाग म्हणून चंद्राच्या मध्य-अक्षांशांमध्ये मॅग्मा महासागरांचा मुख्य पुरावा सापडला होता.
advertisement
काय आहे मॅग्मा?
गृहीतकानुसार, दोन प्रोटोप्लॅनेट (ग्रह निर्मितीपूर्वीचा टप्पा) यांच्यातील टक्करमुळे चंद्राची निर्मिती झाली. मोठा ग्रह पृथ्वी बनला तर लहान ग्रह चंद्र बनला. परिणामी, चंद्र खूप गरम झाला, ज्यामुळे त्याचे संपूर्ण आवरण वितळले आणि 'मॅग्मा महासागर' मध्ये बदलले.
पहिला अंतराळ दिन 
चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग साजरा करण्यासाठी यावर्षी पहिला राष्ट्रीय अंतराळ  दिवस साजरा केला जात आहे. आता दरवर्षी याच पद्धतीने हा दिवस साजरा केला जाणार आहे.
मराठी बातम्या/Viral/
चांद्रयान 3 ची आणखी एक कमाल! चंद्राचं असं रहस्य उलगडलं, शास्त्रज्ञही आश्चर्यचकीत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement