advertisement

तुम्हालाही घ्यायचा आहे चंद्रावरचा प्लॉट? जागेची किंमत आणि खरेदी करायची कशी इथं पाहा

Last Updated:

चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर एका भारतीयाने चंद्रावर जागा घेतली आहे. या प्रक्रियेची संपूर्ण माहिती.

चंद्रावर जमीन घेण्याची प्रक्रिया.
चंद्रावर जमीन घेण्याची प्रक्रिया.
नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र सातत्यानं चर्चेत आहे. भारताच्या चांद्रयान-3नं 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग केलं आहे. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील एका व्यक्तीने चंद्राच्या पृष्ठभागावर जमीन खरेदी केली आहे. देशानं इतिहास रचल्यानंतर दोन दिवसांनी उद्योगपती रुपेश मॅसन यांनी चंद्रावर भूखंड खरेदी केला. न्यूयॉर्क शहरातील 'द लुनार रजिस्ट्री'मध्ये त्यांनी हा व्यवहार केला असून 25 ऑगस्ट रोजी तो प्रमाणित झाला.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मॅसन हे जम्मू काश्मीर आणि लेहसाठी यूसीएमएएसचे प्रादेशिक संचालक म्हणूनही काम करतात. हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना मॅसन यांनी चंद्रावरील मालमत्तेचे तपशील शेअर केले. त्यांनी खुलासा केला की, त्यांनी 'लॅकस फेलिसिटाटिस (आनंदाचे सरोवर) नावानं ओळखल्या जाणाऱ्या Luna Earth Moon, Tract 55-Parcel 10772' वर जमीन खरेदी केली आहे. लूनार रजिस्ट्री वेबसाइटवरील माहितीनुसार, लॅकस फेलिसिटाटिस येथील भूखंडाची किंमत सध्या प्रति एकर 2 हजार 405 रुपये इतकी आहे.
advertisement
ह्युमन राइट्स फॉर प्लॅनेटरी कॉलोनायझेशननं जाहीर केलं आहे की, चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी लूनार प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन प्राईस प्रति एकर 2 हजार 812.61 रुपये आहे. तुम्ही 'द बे ऑफ रेनबोज', 'सी ऑफ रेन्स', 'लेक ऑफ ड्रीम्स', 'सी ऑफ सेरेनिटी' आणि इतर अनेक लँडिंग साइट्सवरील चंद्राच्या जमिनीचा तुकडा खरेदी करू शकता. बे ऑफ रेनबो या ठिकाणी एक एकर जमीन 3 हजार 667 रुपयांना, तीन एकर जमीन 3 हजार 391 रुपयांना, पाच एकर 3 हजार 202 तर 10 एकर 3 हजार 14 रुपयांना उपलब्ध आहे.
advertisement
चंद्रावरील वास्तविक मालमत्तेवर दावे नोंदवण्यासाठी प्रमाणित आणि सरलीकृत प्रणाली प्रदान करण्यासाठी 1999 मध्ये इंटरनॅशनल लुनार लँड्स रजिस्ट्री (ILLR) तयार करण्यात आली आहे.
चंद्रावर संपत्ती घेण्यासाठी नोंदणी फॉर्मसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- lunarregistry.com या अधिकृत लुनार लँड रजिस्ट्रेशन वेबसाईटला भेट द्या.
- होमपेजवर चंद्र मालमत्ता नोंदणी आणि चंद्र मालमत्ता नोंदणी किंमत लेटेस्ट अपडेट तपासा.
advertisement
- डाउनलोड स्क्रोल करा आणि 'बाय लँड ऑन मून' बटणवर क्लिक करा.
- आता चंद्रावर तुमची लँडिंग साइट निवडा जिथे तुम्हाला जमीन घ्यायची आहे.
- चंद्रावरील जमीन मालकाचं नाव आणि एकरचा अंक भरा.
- ईमेल आयडी आणि इतर तपशीलांद्वारे नोंदणी पूर्ण करा.
- ऑनलाईन पेमेंट पद्धत वापरून पेमेंट पूर्ण करा.
advertisement
- आता लूनार प्रॉपर्टी फॉर्म सेव्ह करा आणि चंद्रावरील लूनार लँड रजिस्ट्री तपासा.
चंद्रावर प्लॉट असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं चंद्रावर मालमत्ता खरेदी केली होती. सुशांत सिंग राजपूतनं इंटरनॅशनल लूनार लँड रजिस्ट्रीद्वारे जमीन खरेदी केली होती. त्याची चंद्रावरील जमीन सी ऑफ मॉस्कोच्या जवळ आहे. एका फॉलोअरनं शाहरुख खानला चंद्रावर जागा दिली आहे. याशिवाय, हैदराबादमधील राजीव बागडी आणि बेंगळुरूमधील ललित मोहता यांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
तुम्हालाही घ्यायचा आहे चंद्रावरचा प्लॉट? जागेची किंमत आणि खरेदी करायची कशी इथं पाहा
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement