Chandrayaan 3 बाबत सर्वात मोठी अपडेट! ISRO ने थांबवली चंद्रावरील शोधमोहीम; चंद्रावर असं काही घडलं की...
- Published by:Priya Lad
Last Updated:
चांद्रयान 3 चंद्रावर लँड होऊन दोन आठवडे उलटण्याआधीच इस्रोने मोठा निर्णय घेतला आहे.चांद्रयान 3 चंद्रावर लँड होऊन दोन आठवडे उलटण्याआधीच इस्रोने मोठा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग करून भारताने इतिहास रचला. यानंतर भारताला चंद्रावरील अनेक माहिती मिळाली. असं असताना आता मात्र इस्रोने चंद्रावरील शोधमोहीम थांबवली आहे. चंद्रावर असं काही घडलं की तिथली शोधमोहीम थांबवण्याचा निर्णय इस्रोने घेतला आहे. असं चंद्रावर नेमकं घडलं काय?
चांद्रयान 3 च्या चंद्रावरील कार्याची प्रत्येक अपडेट इस्रो सोशल मीडियावर देत आहे. नुकतीच इस्रोने नवी अपडेट दिली आहेत. ज्यात चंद्रावरील शोधमोहीम थांबवल्याचं सांगितलं आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार रोव्हरने आपलं कार्य पूर्ण केलं आहे. रोव्हर सुरक्षितरित्या एका ठिकणी पार्क करण्यात आलं असून स्लीप मोडवर आहे. रोव्हरचे APXS आणि LIBS हे दोन्ही पेलोड्स बंद करण्यात आले आहेत. या पेलोड्सचा डेटा लँडरमार्फत पृथ्वीवर ट्रान्सफर करून घेण्यात आला आहे.
advertisement
सध्या बॅटरी पूर्ण चार्ज आहे. 22 सप्टेंबर 2023 रोजी पुन्हा सूर्योदय होण्याची अपेक्षा आहे. तेव्हा सोलर पॅनेलला प्रकाश मिळेल. रिसीव्हर चालू आहे. पुढच्या कार्यासाठी पुन्हा यशस्वीरित्या जाग येईल, अशी आशा आहे. तोपर्यंत तो तिथंच भारताचा चंद्रदूत बनून राहिल.
advertisement
Chandrayaan-3 Mission:
The Rover completed its assignments.It is now safely parked and set into Sleep mode.
APXS and LIBS payloads are turned off.
Data from these payloads is transmitted to the Earth via the Lander.Currently, the battery is fully charged.
The solar panel is…— ISRO (@isro) September 2, 2023
advertisement
चंद्रावर सूर्यास्त होऊन रात्र झाली आहे. तापमान घटलं आहे. त्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काम करू शकणार नाहीत. यात सोलर पॅनेल बसवलेले आहेत. ते सौर ऊर्जेवर चालतात. चंद्रावर सूर्यास्त झाल्यावर तेथील तापमान उणे 203 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचते. यात तापमानात हे दोघंही काम करू शकणार नाही.
advertisement
आतापर्यंत चांद्रयान 3 च्या विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील बरीच माहिती मिळवली आहे. चंद्राचं तापमान समजलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंपासारख्या हालचालीही नोंदवल्या गेल्या. याशिवाय चंद्रावर ऑक्सिजन, सल्फरही आढळून आलं. प्रज्ञान रोव्हरने शिवशक्ती पॉईंटपासून 100 मीटर अंतर पार केलं.
Location :
Delhi
First Published :
Sep 02, 2023 10:22 PM IST
मराठी बातम्या/देश/
Chandrayaan 3 बाबत सर्वात मोठी अपडेट! ISRO ने थांबवली चंद्रावरील शोधमोहीम; चंद्रावर असं काही घडलं की...










